शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींची फसवणूक करणारा हरीश दीपाळे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:36 IST

भिसीच्या माध्यमातून येथील व्यावसायिक व सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हरीश दीपाळेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला अमरावतीच्या मोतीनगर भागातून शनिवारी जेरबंद करण्यात आले. तो सहा महिन्यांपासून पसार होता. आता तक्रारकर्त्यांचा ओघ वाढण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देचांदुरबाजार पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : भिसीच्या माध्यमातून येथील व्यावसायिक व सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हरीश दीपाळेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला अमरावतीच्या मोतीनगर भागातून शनिवारी जेरबंद करण्यात आले. तो सहा महिन्यांपासून पसार होता. आता तक्रारकर्त्यांचा ओघ वाढण्याचे संकेत आहेत.दैनंदिन ठेव व भिसीच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करून हरीश देवराव दीपाळे याने डिसेंबर २०१८ पर्यंत अनेक नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक केली. पैसे परत देण्याचे आश्वासन देऊन कुटुंबासह गावातून पसार झाला. दीपाळे याने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार काही नागरिकांसह स्थानिक भोजनालयाचे संचालक अमोल चौधरी यांनी आवश्यक पुराव्यांसह तक्रार नोंदविली. त्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मुख्य आरोपी हरीश दीपाळे, त्याचा भाऊ जगदीश दीपाळे व पुतण्या अमोल दीपाळे यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ४०६, ३६ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होताच जगदीश व अमोल दीपाळे यांनी अटकपूर्व जामीन मिळवला. हरीश हासुद्धा अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या तयारीत होता. मात्र, गुप्त माहितीच्या आधारावर चांदूरबाजार पोलिसांनी सापळा रचून हरीशला भूषण बगळे यांच्या मोतीनगर स्थित घरातून अटक केली. ही कारवाई ठाणेदार उदयसिंग साळुंखे यांच्या मार्गदर्शनात एएसआय शरद भस्मे, जमादार सचिन, पंकज फाटे, शुभांगी काळे यांनी केली. यावेळी फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती. आरोपी हरीश दीपाळेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी लावून धरली.या प्रकरणात हरीश दीपाळे याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान तथ्य समोर येईल. तथापि, फसवणूक झालेल्या नागरिकांनी समोर येऊन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.- उदयसिंग साळुंखे,ठाणेदार, चांदूरबाजार