शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूरच्या हिरापुऱ्यात दोन गटांत हाणामारी, चौघे गंभीर

By admin | Updated: August 5, 2015 00:31 IST

घराशेजारीच विवाह झालेल्या मुलीला सासरची मंडळी त्रास देत असल्याने झालेल्या वादाचे जोरदार हाणामारीत रूपांतर झाले.

विवाहितेचा छळ : आठ जण किरकोळ जखमीअचलपूर : घराशेजारीच विवाह झालेल्या मुलीला सासरची मंडळी त्रास देत असल्याने झालेल्या वादाचे जोरदार हाणामारीत रूपांतर झाले. यात चार जण गंभीर जखमी झाले तर ८ जण किरकोळ जखमी झाले. या हाणामारीत लाठ्याकाठ्यासहीत शस्त्रांचा वापर करण्यात आला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास डिरापुरा भागात घडली. पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. हिरापुऱ्यातील अब्दुल माजीद शे. दाउद यांच्या मुलीचे घराशेजारी राहणारे शे. साबीर शे. घडू यांच्यासोबत ६ वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहीत मुलीला ३ मुलांनंतर सासरच्या मंडळींनी माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास द्यायला सुरूवात केली. तिने त्रास असह्य झाल्याने पाच दिवसांपूर्वी गुरूवारी सासरच्या लोकांविरूद्ध अचलपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यात मो. साजीद मो. अकबर हा साक्षीदार होता. मंगळवारी दुपारी मो. साजीद हा आपल्या घराजवळील चौकात उभा असताना मो. साबीर शे. घडू, शे. अय्युब शे. इस्माईल, अब्दुल मजीद शे. इस्माईल, शे. अजीज शे. इस्माईल, मो. मोसिन अब्दुल रहीम, मो. रासीम मो. रफीक, मो. रफिक शेख इस्माईल, शे. इस्माईल यांनी लाठ्याकाठ्या, पाईप हातात, गुप्त्या, फावडे घेऊन हल्ला चढविला. या हाणामारीत अब्दुल रज्जाक शे. दाउद, अब्दुल कदीर शेख दाउद, अब्दुल मुनाफ शे. कासम, मो. जाहीद, अब्दुल मुनाफ, मो. आसीफ अब्दुल रज्जाक यांच्यासह आदींनी पूर्ण तयारीनिशी तेथे धाव घेतली. दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू झाली. याची माहिती अचलपूर पोलिसांना मिळताच अजय आखरे यांनी सहकारी स्वप्निल तवरसह तेथे तत्काळ पोहोचले. दोन्ही गटांतील लोक हाताबाहेर जाताहेत हे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ पोलीस कुमक घटनास्थळी बोलाविली. पोलीस वेळीच पोहोचल्याने अनर्थ टळला. (शहर प्रतिनिधी)