शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महत्प्रयासाने वाचले गर्भवतीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:24 IST

आशा स्वयंसेविका, रुग्णवाहिकेचा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने एका गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करण्यात आली. संपूर्ण मेळघाटात रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना डॉक्टरांनी त्या महिलेसह तिच्या नवजाताचे वाचविलेले प्राण आरोग्य यंत्रणेची मान उंचावणारे ठरले.

ठळक मुद्देअर्भकही सुखरूप : मेळघाटात आरोग्य विभागाची तारेवरची कसरत

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : आशा स्वयंसेविका, रुग्णवाहिकेचा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने एका गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करण्यात आली. संपूर्ण मेळघाटात रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना डॉक्टरांनी त्या महिलेसह तिच्या नवजाताचे वाचविलेले प्राण आरोग्य यंत्रणेची मान उंचावणारे ठरले.गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता बेला येथील एका गर्भवती आदिवासी महिलेला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. त्यासंदर्भात आशा स्वयंसेविकेने चार किलोमीटर अंतरावरील सलोना आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना माहिती दिली. डॉक्टराच्या सूचनेनुसार, चालकाने रस्त्यावरून वाहत असलेले पाणी, चिखल, निसरड्या वाटेवरून स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णवाहिका काढली. त्या गर्भवतीला सलोना येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथे तिची प्रसूती झाली. वैशाली झनकलाल बेलसरे (२०) असे त्या गर्भवती महिलेचे नाव आहे.वैशाली हिला हृदयाचा आजार असल्याने प्रसूतीच्या वेदना असह्य होत्या. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून यशस्वी प्रसूती केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी अमोल सुर्वे , एच. व्ही. इंगळे, परिचारिका संजीवनी सोळंके, रेणुका झरेकर सह वाहन चालक प्रदीप पवार यांचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे. गत आठवड्यात मोथा येथील एका गर्भवती महिलेला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात मात्र, सोबत डॉक्टर नसल्यामुळे धावत्या रुग्णवाहिकेत प्रसूती होऊन बाळ दगावले होते.कोट्यवधींचा खर्च, खड्डेमय रस्तेमेळघाटात रस्त्यांचा अनुशेष आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. दरवर्षी रस्ते दुरुस्ती व निर्मितीवर कोट्यवधींचा खर्च होऊनही आदिवासी व यंत्रणेची ससेहोलपट संबंधित विभागाची पोलखोल करणारी ठरली.रस्त्यावर पूर्णत: चिखल होता. दुसरीकडे पाण्यामुळे रस्ता बंद होता. मात्र, धाडस करून रुग्णवाहिका नेली व गर्भवती महिलेस आरोग्य केंद्रात भरती केले.- प्रदीप पवार,चालक प्रा.आ. केंद्र, सलोना