शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

हार्ड नव्हे, स्मार्ट वर्क महत्त्वाचे

By admin | Updated: June 18, 2017 00:09 IST

नियमित सराव, अभ्यास, शिकवणी वर्ग हवेच. किती तास अभ्यास केला यापेक्षा एकाग्रतेने किती अभ्यास केला,...

गुणवंताचे मत : लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१७लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नियमित सराव, अभ्यास, शिकवणी वर्ग हवेच. किती तास अभ्यास केला यापेक्षा एकाग्रतेने किती अभ्यास केला, हे अधिक महत्त्वाचे. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्कदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१७ मध्ये शनिवारी येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातआयोजित "टॉक शो"मध्ये गुणवंतांनी त्यांच्या यशाचे रहस्य उलगडले.शहरातील काही शाळांमध्ये दहावीच्या परीक्षेत टॉपर व शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंतांना मिळालेल्या यशासंर्दभात त्याच्यांशी व पालकांशी कौटुंबिक सोहळ्यात संवाद साधण्यात आला. कार्यक्रमाला "लोकमत"चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष पंकज कडू, कोषाध्यक्ष उमेश डवरे आदी उपस्थित होते.सुरूवातीपासून चिकाटीने अभ्यास, हार्ड वर्क कमी स्मार्ट वर्क अधिक केले, असे यशाचे गुपित सांगताना स्कूल आॅफ स्कॉलर्सची अमिषा अंचितलवार हिने सांगितले. दर शनिवारी टेस्ट सिरीज असल्याने आठवडाभर त्याचा असा अभ्यास करायचा की, पुन्हा तो करावा लागू नये. नियमित शिकवणी वर्ग, शाळा यावर भर दिला. मोबाईलवर गेम कधी खेळली नाही, असे मणीबाई गुजराती हायस्कूलची टॉपर कल्याणी धावडे हिने सांगितले. अधिकाधिक वाचन, होमवर्क करणे यावर भर दिला. मोजून केला नाही पण नियमित अभ्यास केला. त्यामुळे सराव करावा लागला नाही, असे गोल्डन स्कूलची टॉपर कृष्णा काळमेघ हिने सांगितले. अभ्यासासाठी पालकांचे व शाळेचे खूप सहकार्र्य लाभल्याचे पोदार स्कूलची श्रद्धा चांडक हिने सांगितले.दहावीचे टेंशन असले तरी सिनेमे पाहिलेच, बाहुबलीमधील प्रभास आपला आवडता हिरो आहे. अभ्यासाचा ट्रेस घालविण्यासाठी डान्स करणे आवडते. यामुळे पुन्हा अभ्यास करण्यास ऊर्जा मिळते, अमिषाने सांगितले. चार महिन्यांपूर्वी खरा अभ्यास केला पहिलेपासून फाऊंडेशन कोर्सवर भर दिला. फेसबुकला अधिक वेळ दिला नाही. मात्र ५०० चे वर मित्र आहे परीक्षेच्या काळातही "बद्रीनाथ की दुल्हनिया" हा सिनेमा पाहिला, असे ज्ञानमाता हायस्कूलचा संकल्प गावंडे यानी सांगितले. गुणवंतांना रवि खांडे यांनी बोलते केले.अभ्यासासाठी बाबापण जागले बाबा पहाटेच जाऊन वृत्तपत्र वाटतात. परंतु मी रात्री अभ्यास करताना सोबत म्हणून बाबाही उशिरा रात्रीपर्यंत जागले. सध्या १२ वी वर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर मेकॅनिकल शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, असे अर्थव तीर्थराज ठाकरे म्हणाला. त्याला बाहेर भटकणे जीवावर येते. मात्र सकाळी वर्तमानपत्र वाचायला पाहिजेच, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. पुस्तकातल्या अभ्यासावर अधिक दिल्याचे इंद्रायणीच्या वडिलांनी सांगीतले. स्पर्धा परीक्षांवर आज मार्गदर्शनलोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१७ मध्ये रविवार १८ जून रोजी द युनिक अ‍ॅकेडमीतर्फे पदवीधर शिक्षणासोबतच एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, या विषयावर विद्यार्थ्यांना बी.बी. गायकवाड यांचे मार्गदर्शन दुपारी १.३० वाजता "लोकमत" अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मोफत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला सुधीर महाजन, प्राचार्य पोतदार इंटरनॅशनल स्कूल प्रमुख उपस्थित राहणार आहे. या संधीचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले आहे.टीव्ही नकोच, पालकांचे मतदहावी हे शालेय जीवनात महत्त्वाचे वर्ष आहे. त्यामुळे टीव्हीचा मोह टाळायलाच हवा, असे रोखठोख मत बहुतांश गुणवंतांनी व पालकांनी व्यक्त केले. चहा, नाश्ता कृष्णा स्वत:च करते. लहानपणापासून ती स्वतंत्र आहे, असे कृष्णाच्या पालकांनी सांगितले. तिने भरपूर अभ्यास केला व टीव्हीदेखील भरपूर बघितला, अगदी परीक्षेच्या दिवशीसुद्धा असेही त्यांनी सांगितले.