फोटो सीपींचा घेणे
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाने जून महिन्यात राबविलेल्या ऑपरेशन मुस्कानमध्ये २५ मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ज्यावेळी ही पीडित बालके त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.
पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात १ ते ३० जूनपर्यंत शहर आयुक्तालय हद्दीत मुस्कान ऑपरेशन १० ही मोहीम राबविण्यात आली. त्यात पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील बालक व इसमांचा शोध घेण्यात आला. तसेच रस्त्यावरील भिक्षेकरी मुलांना शोधून त्यांच्या काळजी व संरक्षणाकरिता बालकल्याण समितीसमक्ष हजर करण्यात आले. या मोहिमेदरम्यान रेकॉर्ड व्यतिरिक्त ८ मुले व १७ मुली असे २५ बालक मिळून आले. त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्या पालकांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले.