अणे-सेना समोरासमोर : नेहरू मैदानात पोलीस बंदोबस्तअमरावती : विदर्भवादी नेते तथा राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला राजकमल चौकात फाशी देण्यात आली. विशेष म्हणजे अणे आणि त्यांचे सहकारी यावेळी याच परिसरात होते.अणे यांच्या नेतृत्वात १ मे रोजी स्वतंत्र विदर्भाचे झेंडे फडकणार आहेत. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला अणे यांनी टाऊन हॉलमध्ये जाहिर सभा घेतली. तत्पुर्वी एका रॅलीने ते राजकमल चौकात पोहोचले, त्यावेळी युवासेनेचे पराग गुडधे आणि ललित झंझाळ यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार केला. तथा श्रीहरी अणे यांचा जाहिर निषेध केला.श्रीहरी अणेंच्या नेतृत्वात एकीकडे स्वतंत्रविदर्भ राज्यनिर्मितीसाठी सायंकाळच्या सुमारास राजकमल चौकापर्यत रॅली काढण्यात आली, तर दुसरीकडे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. या पार्श्वभूमिवर येथील टाऊन हॉलमध्ये झालेल्या अणे यांच्या सभेला पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ही सभा शिवसेनेकडून उधळून लावण्याचा प्रयत्न होईल, अशा सूचना प्राप्त झाल्याने अणे यांनाही सुरक्षा पुरविण्यात आली. आज सायंकाळच्या सुमारास स्वतंत्र विदर्भवादी आणि अखंड महाराष्ट्रवादी समोरासमोर ठाकले . (प्रतिनिधी)
श्रीहरी अणेंच्या पुतळ्याला फाशी
By admin | Updated: May 1, 2016 00:08 IST