तंत्रनिकेतनचे यश : अभ्यांगांना लागणार कमी श्रमअमरावती : येथील जी.एच. रायसोनी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी अभ्यांगाकरिता कमी श्रमात चालविता येणारी हॅन्डीकॅप स्टेअरिंग सायकलची निर्मिती करून शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे. सदर सायकलमध्ये स्टेअरिंगला हाताच्या मदतीने समोर-मागे ओढल्याने सिंगल सलाइडींग मॅकेनिझमचा वापर करून एका जागेवरून समोरच्या बाजूला रस्त्यावर चालविता येणे सहज शक्य आहे. मागच्या बाजूलासुद्धा ही सायकल चालविता येते. स्टेअरिंगला डाव्या व उजव्या बाजूला फिरविता येते त्याचप्र्रकारे सायकलच्या चाकांची स्थिती आपल्या इच्छेनुसार वळविता येते. दिव्यांगांकरिता ही सायकल फायदेशीर ठरेल, असे मत रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. ही सायकल तयार करण्यास ८ ते ९ हजार रुपये खर्च लागला पॉलीेटेकनिकच्या अंतीम शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रात्येक्षिकतेसाठी एक प्रोजेक्ट देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी यासंदर्भातील यू-टुबवर महिती शोधून त्यामधून सायकल तयार करण्याचे मार्गदर्शन घेतल्याचे हर्षराज पांडे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)ही सायकल कॉलेजच्या प्रोजेक्ट ईव्हेंटमध्ये ठेवण्यात आली होती. सायकल तयार करण्यासाठी ८ ते ९ हजार एवढा खर्च आला. दिव्यांगांना कमी श्रमात ही सायकल चालविता येणार आहे. अशा सायकली निर्माण व्हायला हव्यात. - हर्षराज पांडे, विद्यार्थी रायसोनी तंत्रनिकेतन, अमरावती
रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी बनविली हॅन्डीकॅप स्टेअरिंग सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 00:06 IST