शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अपंग कुटुंबासाठी मदतीचे हात सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:07 IST

सामाजिक बांधीलकीच्या अनोख्या संकल्पनेतून अपंग कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी येथील नवआझाद मंडळ व गावकरी सरसावले. हनुमान जयंतीला गोळा झालेल्या राशीतून या अपंग कुटुंबास १ लाख ११ हजार १११ रुपये बँकेत सुरक्षा ठेव करून देण्यात आली.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : नांदगावातील नवआझाद मंडळ व गावकऱ्यांचा स्तुत्य उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : सामाजिक बांधीलकीच्या अनोख्या संकल्पनेतून अपंग कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी येथील नवआझाद मंडळ व गावकरी सरसावले. हनुमान जयंतीला गोळा झालेल्या राशीतून या अपंग कुटुंबास १ लाख ११ हजार १११ रुपये बँकेत सुरक्षा ठेव करून देण्यात आली.नांदगाव खंडेश्वर येथील पांडुरंग गोविंद दुधे यांचे वय ५८ वर्षे आहे. त्यांनी अपंगत्वामुळे दृष्टी गमावली. त्यांचा मुलगा उमेश (२०) हा दोन्ही पायांनी अपंग आहे. दुसरा मुलगा दीपक (१७) हा दोन्ही पायांनी व हातांनी अपंग आहे. या कुटुंबाचा पांडुरंगची पत्नी विमलाबाई हीच एकमेव आधार आहे. अशा या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी गावातील शेकडो हात सरसावले. यात मंडळाचे वासुदेव लोखंडे, कैलास चांदणे, नीलेश ब्राम्हणवाडे, रवींंद्र ठाकूर, मनोज खेडकर, नागेश चांदणे, नीलेश ईखार, दिनेश जोगदंडे, किशोर शिरभाते, मंगेश पचगाडे या युवकांनी गावकऱ्यांकडून मदत गोळा केली व छोट्याशा समारंभात राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक सदानंद जाधव, माजी सैनिक मधुकरराव पातोडे, शहीद विकास उईके यांच्या आई बेबी उईके, ठाणेदार मगन मेहते, नारायणदास वैष्णव यांच्या हस्ते व गावकऱ्यांच्या साक्षीने आहेर करून सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील बरीच मंडळी हजर होती. तसेच यावेळी राधे-राधे ग्रुपची स्थापना करून अपंगांसाठी व वंचित घटकांसाठी कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.