शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

कॉम्प्युटर आॅपरेटर्समध्ये निम्मी कपात

By admin | Updated: February 4, 2017 00:10 IST

महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या वाजवीपेक्षा अधिक कंत्राटी कॉम्प्युटर आॅपरेटर्सची कपात करण्यात येणार आहे.

आस्थापना खर्चात बचतीची भूमिका : संगणक कर्मचाऱ्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्हअमरावती : महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या वाजवीपेक्षा अधिक कंत्राटी कॉम्प्युटर आॅपरेटर्सची कपात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७० पैकी ३५ जणांना कामावरून कमी करण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित आॅपरेटर्सची छाननी केली जाईल. अनावश्यक ठिकाणचे कंत्राटी कर्मचारी कमी करण्यासोबतच आस्थापना खर्चात बचत करण्याची भूमिका ठेवून आयुक्तांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कपातीचे पाऊल उचलले आहे. तत्कालीन आयुक्तांच्या कार्यालयात एका खासगी कंत्राटी एजन्सीकडून महापालिकेने कॉम्प्युटर आॅपरेटर्सची सेवा घेतली आहे. मूळ करारनामा अल्पसंख्येचा असताना त्या संस्थेत वेळोवेळी भर घालण्यात आली. तूर्तास महापालिकेच्या विविध विभागांत ७० कॉम्प्युटर आॅपरेटर्स आहेत. दादा आणि भाऊंच्या दबावापोटी विनाकारण ही संख्या फुगविली गेली. वास्तविक पाहता इतक्या मोठ्या संख्येत कॉम्प्युटर आॅपरेटर कार्यरत असतील तर संबंधित विभागातील कनिष्ठ किंवा वरिष्ठ लिपिकांना संगणकाचे ज्ञान नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. कर्मचाऱ्यांच्या संगणकीय ज्ञानाचा भाग वगळला तरीही कंत्राटी तत्त्वावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची काही ठिकाणे सेवा आवश्यक नसतानाही ते कार्यरत आहेत. तसे निरीक्षण दस्तुरखुद्द आयुक्तांनी नोंदविले आहे. अनावश्यक ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्याने मनपाच्या आस्थापनाखर्चात अवाजवी वाढ होत आहे. त्याअनुषंगाने सर्व घटकप्रमुखांनी त्यांच्या विभागात कार्यरत असलेल्या कॉम्प्युटर आॅपरेटर, सुरक्षारक्षक व अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामाचा आढावा घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्वात पहिली कारवाई कॉम्प्युटर आॅपरेटर्सवर होणार आहे. त्यांची संख्या निम्म्याने कपात करण्यात येईल. तसे निर्देश उपायुक्त विनायक औगड यांना देण्यात आले आहेत. कंत्राटीबाबत आज बैठकसुरक्षारक्षक, कॉम्प्युटर आॅपरेटर्स व अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांची आवश्यकता याबाबतच आढावा शनिवारी आयुक्तांकडून घेतला जाणार आहे. ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता प्रपत्रातील माहितीसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.अन्यथा विभागप्रमुखांच्या वेतनातून कपात४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता प्रभागातील माहिती व तपशिलासह उपस्थित राहावे, जेणेकरून अनावश्यक कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणता येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त यापुढे एखाद्या विभागात अनावश्यक कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्यास तो जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर निश्चित करण्यात येईल व अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन संबंधित विभागप्रमुखांच्या वेतनातून वसूल करण्यात येणार आहे.