शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आधी राष्ट्रगीत; मगच दैनंदिन कामकाज सुरू

By admin | Updated: June 26, 2017 00:14 IST

नगरपालिकेतील कर्मचारी पूर्वी लेटलतीफ ठरत होते. पण नवनिर्वाचित मुख्यधिकारी गीता वंजारी यांनी पदभार स्वीकारताच....

आदर्श उपक्रम : दर्यापूर पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना लावली शिस्तसचिन मानकर। लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : नगरपालिकेतील कर्मचारी पूर्वी लेटलतीफ ठरत होते. पण नवनिर्वाचित मुख्यधिकारी गीता वंजारी यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी कर्मचाऱ्यांना सकाळी १० च्या ठोक्याला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रोज राष्ट्रगीत झाल्यानंतर नगरपालिकेच्या कामकाजाची सुरूवात व्हावी, असा एक नवा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. या उपक्रमाचे नगराध्यक्षा नलिनी भारसाकळे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांना वेळवर येण्याची शिस्त लागावी म्हणून दर्यापूर नगरपालिकेच्या मुख्यधिकारी गीता वंजारी या सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात हजर होऊन स्वत: शिस्तीचे पालन करतात. राष्ट्रगीताला हजर राहण्याकरिता येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होते. पालिकेत राष्ट्रगीत झाल्यानंतरच कामकाजाला सुरुवात होते. कर्मचारीसुध्दा लगेच आपआपल्या दालनात जातात. यामुळे येथील कर्मचाऱ्यांचा विश्वास वाढला आहे. रोज देशभक्तीचे नारेसुध्दा लावले जात आहे. एवढेच नाही, तर यानंतर होणाऱ्या मासिक सभासुध्दा राष्ट्रगीत म्हणूनच सुुरू करण्यात येईल, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सर्व सदस्यांनीसुध्दा या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे दर्यापूर नगरपालिकेत एक शिस्तप्रिय खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आहे. राष्ट्रगीताने कामकाजाची सुरुवात करणे ही राज्यातील पहिलीचे नगरपालिका असेल की हा निर्णय झाला आहे. त्यामुळे नागरिकांनीही या कार्याचे स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याची शिस्त लागावी व नगरपालिकेच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने व्हावी, या हेतुनेच हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व कर्मचारी १० च्या ठोक्याला हजर राहतात, ही अभिनंदनीय बाब होय.- गीता वंजारी, मुख्याधिकारी