शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या बसेस रस्त्यावर; त्यांनाही प्रवासी मिळेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:01 IST

अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आठ आगारांतील  कर्मचारी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, याकरिता संपावर आहेत. त्यानंतर एसटी बस रस्त्यावर दिसली नाही. आता काही कर्मचारी  कामावर परत आले असल्याने  एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढत असून,  आज  ५२ बसेसव्दारे १४६ फेऱ्या सुरू आहेत.

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या तीन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे. जिल्ह्यातील १,४४४ फेऱ्यांपैकी १४६ फेऱ्या सुरू असून  बसेस निम्म्याहून अधिक रिकाम्याच धावत आहेत. त्यामुळे एसटीचे प्रवासी गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  अमरावती विभागातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या आठ आगारांतील  कर्मचारी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, याकरिता संपावर आहेत. त्यानंतर एसटी बस रस्त्यावर दिसली नाही. आता काही कर्मचारी  कामावर परत आले असल्याने  एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढत असून,  आज  ५२ बसेसव्दारे १४६ फेऱ्या सुरू आहेत. मात्र, एसटीला  प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दिसून येत आहे.  

४,००,००,००० रुपयांचा फटका बसला चार महिन्यात राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाला आतापर्यंत जवळपास  चार कोटींचा फटका बसला आहे. तर गेल्या चार महिन्यांत ५३ बसव्दारे १५३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ कोटी ८० लाख रूपयांचे उत्पन्न अमरावती विभागाला मिळाले आहे. 

आगारप्रमुख काय म्हणतात?एसटीचा संप सुरू झाल्यानंतर काही दिवस बसेस बंद होत्या. अशातच आता बसेस सुरू झाल्या आहेत. अनेक मार्गांवर बसेस धावू लागल्या आहेत. त्यांना प्रवाशांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे.- संदीप खवले, आगारप्रमुख, अमरावती

आठही आगारांत ५० पेक्षा जास्त बसेस धावतात. एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी ५० खासगी चालक करारावर घेतले आहेत,वाहकांची जबाबदारी ही एका खासगी कंपनीला दिली. त्यामुळे बसेस पूर्ण सुरू होतील.- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक

ग्रामीण भागात बसेस कधी जाणार?जिल्ह्यात एसटीला ग्रामीण प्रवाशांचा मोठा आधार असतो. परंतु, एसटीचा संप सुरू झाल्यापासून गत तीन महिन्यांत ग्रामीण भागात एकही बस गेलेली नाही. ग्रामीण भागातील प्रवासी शहरात खासगी वाहनांनी येतात. त्याचाही एसटीवर परिणाम झाला आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप