शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

चांदूरबाजार तालुक्यातील गारपीटग्रस्तांना मदतीची आस ?

By admin | Updated: June 12, 2016 00:09 IST

तालुक्याला २८ व २९ फेब्रुवारी रोजी जबरदस्त गारपिटीसह वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले.

१० हजार हेक्टर क्षेत्राला फटका : फळपिकांचे सर्वाधिक नुकसानचांदूरबाजार : तालुक्याला २८ व २९ फेब्रुवारी रोजी जबरदस्त गारपिटीसह वादळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यात तालुक्यातील ७ मंडळांपैकी ६ मंडळांतील १४ हजार ७९१ शेतकऱ्यांचे १० हजार २४२ हेक्टर वरील विविध पिकांना फटका बसला होता. यात सर्वाधिक नुकसान फळपिकाचे झाले होते. याला तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांपर्यत मदत पोहचली नाही. परिणामी गारपीटग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.१६ मार्च २०१६ याबाबतचा अंतिम अहवाल तालुका महसूल विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला. परंतु याबाबत मंत्रिमंडळाकडून कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे ही मदत केंव्हा मिळणार, हे अजून अनिश्चितच आहे. आधीच दुष्काळ, त्यात गारपिटीचा दुष्काळात तेरावा महिना झाल्याने गारपीटग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी मदतीची आतुरतेने वाट पाहत असून शासनाच्या मदतीकडे त्यांचे डोळे लागले आहे. परंतु राज्य शासनाची शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्याची धिम्या गतीची पद्धत पाहता हा दिवस कधी उजाडेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही.महसूलच्या अंतिम अहवालानुसार तालुक्यात चांदूरबाजार मंडळातील २४ गावांमधील २ हजार ३६३ हेक्टर क्षेत्रावरील गहू, ३९५ हेक्टर हरभरा, ६३८ हेक्टर कांदा व १३७ हेक्टर फळपिके व १ हजार १०४ हेक्टर इतर पिके ८८ हेक्टरबाधीत झाले आहे. तसेच बेलोरा मंडळातील २६ गावांना गारपीटीचा फटका बसला असून यात एकूण ६४३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. शिरजगाव कसबा मंडळात २२ गावांमधील २ हजर ४१३ हेक्टर क्षेत्र बाधीत असून, यात पीकनिहाय क्षेत्र गहू ४०५ हेक्टर, हरभरा १०८ हेक्टर, कांदा ३६३ हेक्टर, फळपीक १ हजर ७७९ हेक्टर, व इतर पिके ५७ हेक्टर इत्यांदीचा समावेश आहे. तसेच करजगाव मंडळामध्ये १८ गावांतील १ हजार हेक्टर फळपिके, १ हजार ९० हेक्टर इतर पिके प्रभावित झाले होेते, तर तळेगाव मोहना मंडळामधील ११ गावांतील १ हजार ८१९ हेक्टर क्षेत्र गारपिटीने बाधित झाले. यात गहू ४२३ हे. कांदा १०२ हे. फळपिके १ हजार ७१ हे. इतरपिके २४ हेक्टरचा समावेश आहे. आसेगाव मंडळात १८ गावांमधील १ हजार ९४ हेक्टर क्षेत्राला गारपीटचा दणका बसला असून यात गहू ३९२ हेक्टर, हरभरा ४०४ हेक्टर, कांदा ८८ हेक्टर, फळपीके १५२ हेक्टर, इतर पिके ५७ हेक्टर असा पिकनिहाय समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)