शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

शहरात गारपीट, जिल्हा बचावला !

By admin | Updated: March 10, 2015 00:27 IST

शहराला सोमवारी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. सायंकाळी ७ वाजताच्या

अमरावती : शहराला सोमवारी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान शहरात वादळी पाऊस आणि गारपीटही झाली. तब्बल तासभर पावसाचे थैमान सुरू होते. होळीनंतर उन्हाच्या झळा नुकत्याच जाणवू लागल्या असताना या पाऊसधारा दिलासा देणाऱ्या ठरल्या. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी तब्बल १७ तास अखंड बरसलेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली होती. परंतु सोमवारचा पाऊस आणि गारपीट केवळ शहरापुरती मर्यादित असल्याने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा होणारी हानी टळली. हवामान खात्याने यापूर्वीच ९ व १० मार्च रोेजी अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. ‘लोकमत’ने त्याबाबतचे वृत्तही प्रकाशित केले होते. त्यानुसार सोमवारी दुपारपासूनच शहरातील वातावरणात बदल जाणवू लागला. आकाश ढगांनी भरून आले. सायंकाळी ७ च्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सोबतच गारांचा वर्षावही सुरू झाला. (प्रतिनिधी)नागरिकांची त्रेधा : चिखलदऱ्यात बरसल्या तुरळक सरी शहरात बोराच्या आकाराची गार वादळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. बोराच्या आकाराच्या गारांनी शहरातील रस्ते व्यापून गेले. क्षणात रस्ते निर्मनुष्य झाले. वेगाने कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. परंतु शहरवासियांनी हा पाऊस एन्जॉय केला. ग्रामीण भागाला फटका नाही शहरात गारपीट सुरू असताना ग्रामीण भागात चिखलदरा वगळता अन्य कोठेही पाऊस पडल्याचे वृत्त नाही. चिखलदरा तालुक्यात तुरळक सरी बरसल्या. अंजनगाव, तिवसा, दर्यापूर, वरूड, मोर्शी व इतर तालुके मात्र कोरडेच होते. बडनेऱ्याच्या आठवडी बाजारात नागरिकांची तारांबळबडनेरा येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. आसपासच्या वीस-पंचवीस खेडेगावांतील ग्रामस्थ येथे बाजारासाठी येतात. सायंकाळी वादळी पाऊस व गारपीट सुरू झाल्याने बाजारातील दुकानदार, व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांचीदेखील प्रचंड तारांबळ उडाली. साहित्याचे नुकसान झाले. पळापळ माजली. परंतु गारा मोठ्या आकाराच्या नसल्याने कोणतीही हानी झाली नाही.