शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात २२ लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: September 6, 2014 01:28 IST

राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना देखील इतर राज्यांच्या सीमेमधून अमरावतीत गुटख्याची तस्करी होते. अन्न व औषधी प्रशासनाने जिल्ह्यात केवळ एका वर्षात २२ लक्ष रूपयांचा गुटखा जप्त केला.

संदीप मानकर अमरावतीराज्यात सर्वत्र गुटखाबंदी असताना देखील इतर राज्यांच्या सीमेमधून अमरावतीत गुटख्याची तस्करी होते. अन्न व औषधी प्रशासनाने जिल्ह्यात केवळ एका वर्षात २२ लक्ष रूपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईवरून गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान विक्री केली जाणाऱ्या भेसळयुक्त खव्याच्या मिठाई व प्रसदावरही यंदा एफडीएची करडी नजर राहणार आहे. देशातील २७ राज्यांत व चार केंद्रशासित प्रदेशात गुटखाबंदीचे आदेश लागू असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची व गुटखाजन्य पदार्थांची विक्री होत आहे. २० जुलै २०१३ ते १५ जुलै २०१४ पर्यंत अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या केलेल्या कारवाईत २२ लाख ५ हजार १२ रूपयांचा गुटखा जिल्ह्यात जप्त करण्यात आला. गुटखा जप्तीची कारवाई एकीकडे सुरु असताना दुसरीकडे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गुटख्याची दामदुप्पट भावाने विक्री सुरु आहे. शहरात गुटखा कोणत्या मार्गाने येतो हे कुणीही सांगत नाहीत. परंतु शहरातील सर्व पानविक्रेत्यांकडे अधिक दराने गुटखा विक्री होतो. अन्न सुरक्षा मानद कायदा २००६ अधिनियम २०११ नुसार गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येते. अन्न सुरक्षा आयुक्त मुंबई यांनी २० जुलै २०१४ पासून पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी गुटखा बंदी प्रतिबंधाचे आदेश जारी केले आहेत. ही कारवाई अन्न व सुरक्षासह आयुक्त सुरेश देशमुख व सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांनी केली.