शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुरूकुंज मोझरी नि:शब्द!

By admin | Updated: October 13, 2014 23:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार १३ आॅक्टोबर रोजी जमलेल्या लाखो गुरूदेवप्रेमींनी राष्ट्रसंतांना साश्रूनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली : देशभरातून जमले लाखो भक्तअमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार १३ आॅक्टोबर रोजी जमलेल्या लाखो गुरूदेवप्रेमींनी राष्ट्रसंतांना साश्रूनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रसंतांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी लाखो भाविकांचा मेळा दुपारी २ वाजतापासून कार्यक्रमस्थळी मुख्य मंडपात गोळा झाला होता.दोन मिनिटे पाळला मौनअमरावती : मराठी पंचांगानुसार अश्विन कृष्ण वद्य पंचमीला दुपारी ४.५८ ला राष्ट्रसंत श्री तुकोडजी महाराजांचे महानिर्वाण झाले होते. (११ आॅक्टोबर १९६८) तेव्हापासून दरवर्षी या दिवशी ४.५८ वाजता राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो गुरूदेवप्रेमी देशभरातून गुरूकुंजात दाखल होतात. दोन मिनीट गुरूकुंंज मोझरीत कमालीची शांतता पसरते. स्वर्ग प्राप्तीसाठी भक्ती करण्यापेक्षा संपूर्ण संसार स्वर्गमय करण्याची शिकवण समाजाला देणाऱ्या व घरदार न सोडता संसारात अमरपदप्राप्तीचे धडे जनतेला देणाऱ्या राष्ट्रसंतांचे विचार अध्यात्माची विज्ञानाशी सांगड घालणारे होते. त्यामुळे राष्ट्रसंतांचा ‘महापरिनिर्वाण’ दिन गुरूदेवप्रेमी संकल्पदिन म्हणून साजरा करतात. मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी ३.३० वाजता ‘गुरूदेव हमारा प्यारा है, जीवन का उजीयारा है’ या राष्ट्रसंतांच्या भजनाने सुरूवात झाली. मौन श्रद्धांजलीनिमित्त खास संहिता तयार करुन संहितेचे वाचन अत्यंत भावविभोरपणे उपस्थितांसमोर केले गेले. या संहितेमध्ये ‘‘गुरूनाम की नैया हमें भव-दु:ख से तरवायेगी।गुरू की चरणरज ही हमे मन-भौर से हरवायगी।।गुरू-प्रेम की बरखा हमें सत ज्ञानको बतलायेगी।गुरू की कृपा हमको सौख्य में मिलवायगी।।’या गुरूला आर्जव करणाऱ्या भजनांची साद घातली गेली. तर सद्यस्थितीवर प्रकाश टाकून राष्ट्रसंतांनी धर्मांधतेच्या विरोधात फटकारलेल्या ऐ धर्मवालों,धर्मसे तुमने किया बेपार है।सब देवता करके अलग, फैला दिया व्यभीचार है।।इन्सान को हैवान कर,झगडा मचाया धर्म का।भगवान तो पिछे रहा,सब पेटपुंजीही जगी।।या भजनाद्वारे प्राण फुंकले गेले. समाजातील वाढत्या साधुगिरीवर प्रहार करणाऱ्या ‘अब तो सब पंडितोंकी साधुओंकी मौत है।जाना उन्होंने धर्म नहीं था,क्या हमारी बात है।।अशी एकापेक्षा एक समाजातील अनिष्ट चाली-रुढींवर प्रहार करणाऱ्या राष्ट्रसंतांची भजने गायिल्याने मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रम अधिकच भावविभोर झाला. यावेळी सर्व परिसर निरव व नि:शब्द झाला होता. राष्ट्रसंत पुन्हा विराजमान होऊन भक्तांसोबत संवाद साधत असल्याचा भास प्रत्येकाला होत होता. मौन श्रध्दांजलीच्या वेळी एवढी तन्मयता राष्ट्रसंतप्रेमींमध्ये बघायला मिळाली. ठीक ४.५८ वाजता महाद्वारावरील घंटा निनादली आणि राष्ट्रसंतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो राष्ट्रसंतप्रेमी राष्ट्रसंतांच्या महासमाधीकडे वळले. यावेळी महामार्गावरील वाहतूकसुध्दा बंद होती. या कार्यक्रमाची संहिता उपसर्वाधिकारी व राष्ट्रसंतांचे गाढे अभ्यासक रूपराव वाघ यांनी तयार केली. कार्यक्रमाचे नियोजन अध्यात्म विभागप्रमुख राजाराम बोथे यांनी केले. मौन श्रध्दांजलीदरम्यान मोझरीमध्ये दोन मिनिटे निरव शांतता पसरली होती. सारा आसमंत गुरूदेवमय झाले होते. पुण्यतिथी महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून या कार्यक्रमासाठी गुरूदेवप्रेमींनी हजेरी लावली होती. मौन श्रध्दांजलीसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.