शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या दिव्यदृष्टीतून गुरूपौर्णिमा

By admin | Updated: July 31, 2015 00:47 IST

‘गुरूदेव सद्गुरू आडकोजी ने कृपी सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो आशिष यह मुझको दिया...

तिवसा : ‘गुरूदेव सद्गुरू आडकोजी ने कृपी सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो आशिष यह मुझको दियातबसे भजन-लेखन बढा, इस हाथ से सम्भले नही, गंगा प्रवाहित वाक्यरचना सहज ही होती गई’ या शब्दांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांचे गुरू आडकोजी महाराजांबद्दलची भावना व्यक्त केली आहे. ज्याने या विराट ब्रह्मांडातील दिव्यतत्त्वबोध जगाला दिला, त्यांचे सद्गुरूविषयी चिंतन, विचार आजही प्रेरक ठरावेत असे आहेत. ज्ञान काही एका जन्मात प्राप्त होत नाही, हे सांगताना राष्ट्रसंत म्हणतात. ‘तुकड्यादास म्हणे ही सांगड कोटी जन्माची, तरीच फळे सद्गुरू कृपा अंतर्ज्ञानाची’. हे ज्ञान कोणा हाडामासाच्या गुरूकडून प्राप्त होत नाही. ‘गुरूकृपा नही पडी सडकपर मेरा मै जानू, बीज न बोए जाते खडकपर मेरा मै जानू’ यातून गुरूकृपा किती खडतर प्रवासातून मिळते व प्रसंगी जीवाचा बलिदानही देण्याची तयारी ठेवावी लागते, असे राष्ट्रसंत सांगतात. अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवामंडळाचा पायाही याच तत्त्वबोधावर आधारित आहे. ‘जनी देखिला जनार्दन, हीच आत्मानुभवाची खुण’, हे राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील उद्बोधन गुरूत्वाकडे व जीवनाच्या पूर्णत्वाकडे नेणारे आहे. गुरू कसा असावा आणि त्याची ओळख कशी करून घ्यावी याचे विवेकज्ञान समाजातील साध्या भोळ्या भक्तांना लक्षात घेणे गरजेचे आहे. भक्तीच्या मार्गात गुुरूच्या शोधात असणाऱ्या गुरू-शिष्य परंपरा जोपासणाऱ्या साधकांना हितबोध देताना राष्ट्रसंत म्हणतात. ‘न होत गुरूजी पूजा, गुरूस माळ घालुनिया, न होत गुरूची पूजा गुरूस गंध लावुनिया, पूजा गुरूची होत असे, वचने त्यांची पाळुनी, तसेच जगी वागणे, जरी प्राण जायी क्षणा’ ही गुरू-शिष्य परंपरा राष्ट्रसंतांना अपेक्षित आहे. गुरू उत्तम आचरणशील, ज्ञानवान असतील तरच हे सर्व साधणे शक्य आहे. नाही तर ढोंगी गुरूंमुळे माणूस माणूसही राहत नाही. तो राक्षसच होतो. पोट भरणारे, आळशी, व्यसनाधीन गुरू आपल्या शिष्यांना उन्नत करण्याकडे लक्ष देणेच शक्य नाही. कारण, त्यांना पापाचा पैसा घेऊन स्वत:च्या बढाईचे, परमार्थाच्या बडेजावाचे दुकान वाढवायचे असते. अशांना गुरू करू नये. खरा गुरू म्हणजे अनुभवाचा बोध देणारा पुरूष. असे पुरूष शोधावे लागतात. ते गल्लोगल्ली मिळत नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रसंतांनी गुरूची विराट व्याप्ती ग्रामगीतेत सांगितली आहे. सन्मार्ग दाखविणारा आणि शिष्याला त्याच्या न्युनत्वाची जाणिव करून न देता त्याचे दोष दूर करणाराच सच्चा गुरू असतो.महापुरूष वेगळाले, परि गुरूत्वी मिळोनि गुरूचि झाले, व्यक्तिपण, धर्मपणही मुराले, गुरू-स्वरूपी, त्याचे पूजन गंधाने नोहे, त्याचे मंदिर विशाल आहे, विशालतेला मर्यादा राहे, परि गुरू त्याहूनि अमर्याद, भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण, सर्व पृथ्वी जयाचे आसन, चंद्र-सूर्य नंदादीप जाण, गुरुदेवाचे !- राजेश बोबडे, गुरूकुंज मोझरी.