शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

‘बारूद गँग’चा बालेकिल्ला होणार उद्ध्वस्त!

By admin | Updated: September 6, 2015 00:00 IST

जुळ्या नगरीत हैदोस घालणाऱ्या कुख्यात ‘बारूद गँग’च्या कुकृत्यांचा बालेकिल्ल्ला असलेल्या येथील चौधरी चौकातील अतिक्रमण हटविण्याची तयारी

चौधरी चौकातील अतिक्रमण काढणार : १७ दुकानदारांना बजावल्या नोेटिसीअमरावती / अचलपूर : जुळ्या नगरीत हैदोस घालणाऱ्या कुख्यात ‘बारूद गँग’च्या कुकृत्यांचा बालेकिल्ल्ला असलेल्या येथील चौधरी चौकातील अतिक्रमण हटविण्याची तयारी आता पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. येथील १७ अतिक्रमितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. १५ दिवसांत दुकानदारांनी अतिक्रमण न काढल्यास पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे ते उद्ध्वस्त केले जाईल, असा इशारा नोटीसीतून पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे. रेती तस्करीच्या वादातून ‘बारूद गँग’ने अमित बटाऊवाले नामक निर्दोष तरूणाची हत्या केली. त्याचे तीव्र पडसाद उमटले. याप्रकरणी दोषी आढळलेल्या पोलिसांच्या बदल्या झाल्यात. रेती तस्करांना पाठीशी घालणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात ‘लोकमत’ने निर्भीड लिखाण करून ‘बारूद गँग’चे अक्षरश: वाभाडे काढले. परिणामी प्रशासनाला जाग आली. आता कारवाईच्या याच श्रुंखलेत ‘बारूद गँग’चा ठिय्या असलेल्या येथील चौधरी चौकातील अतिक्रमण हटविले जाणार आहे. येथूनच ‘बारूद गँग’चे अवैध धंदे संचालित होत असल्याने पालिकेद्वारे केली जाणारी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अचलपूर उपजिल्हा रूग्णालयाजवळ चहा टपऱ्या, पान टपऱ्या, कँटीन आहेत. अतिक्रमित जागेवरच हे व्यवसाय चालविले जातात. या व्यवसायामुळे बऱ्यापैकी रोजगार मिळाला आहे. परंतु बारूद गँगचे गैरव्यवहारही येथूनच चालतात, हेदेखील तेवढेच खरे आहे. ‘बारूद गँग’च्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन राहात होते. आता मात्र, हे अतिक्रमण हटविले जाणार असल्याने जुळी नगरी नक्कीच मोकळा श्वास घेईल.हे आहेत अतिक्रमणधारकसै.फईम सै.बिस्मिल्ला, दिलीप बिजवे, सलिमखाँ हमिदखाँ, सै.रउफ सै.बिस्मिल्ला, सै. अली मुमताज अली, अजहरअली जामिनअली, नरेश टापरे, सुलतान खाँ घुडेखाँ, शे. नजीर शे. अन्नू, सै.मुख्तार सै.मुमताज, शे. वजीर शे.बुरू, शे.हसन रज्जाक, शे.मोबीन शे. बब्बू, इरफान खाँ, वहिदभाई, शे. महेमूद आदींचा अतिक्रमणधारकांच्या यादीत समावेश आहे. या अतिक्रमणधारकांना महाराष्ट्र नगर परिषद कायदा १९६५ कलम १८१ व १८९ (८) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.