शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये कांद्याची निर्यात थंडावली, उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:41 IST

कांद्यापासून पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी गुजरात राज्यात एप्रिल ते जूनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा हजारो ट्रक कांदा पाठविण्यात येतोे. मात्र, यंदा गुजरात राज्यात कांद्याची आवक चांगली झाल्याने या राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ते जून दरम्यान निर्यात झाला नाही.

ठळक मुद्देभाजीबाजारात कांदा, बटाट्याची आवक घटली : पावसाचाही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कांद्यापासून पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी गुजरात राज्यात एप्रिल ते जूनमध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा हजारो ट्रक कांदा पाठविण्यात येतोे. मात्र, यंदा गुजरात राज्यात कांद्याची आवक चांगली झाल्याने या राज्यात अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा एप्रिल ते जून दरम्यान निर्यात झाला नाही. परिणामी स्थानिक कांदा उत्पादकांना फटका बसला असून, आता येणाºया काही महिन्यात भाव वाढण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे मत कांदा विक्रेते व कृषी अभ्यासक सतीश कावरे यांनी व्यक्त केले.गेल्या आठ दिवसांपासून पाऊस असल्याने बटाटे, कांदा, लसूण व इतर पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, किरकोळ व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उचलत नसल्याचे यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या अमरावती फळ व भाजीबाजारात पांढरा बटाटा हा आग्रा, सिसागंज (उ.प्र.) येथून येत असून, त्याची नेहमीपेक्षा आवक व उचल ४० टक्क्यापर्यंत कमी असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. आलू ला १२००ते १४०० रुपये क्विंटलमागे भाव मिळत आहे, तर कांद्या हा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून येत आहे.लसूण इंदूर, निमच, कोटा या ठिकाणावरून अमरावतीत दाखल होत असून, त्याला बाजार समितीत १८०० ते २२०० क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. मात्र, या सर्व भाजीपाल्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक मागणी असते. एप्रिल ते जून दरम्यान एकही ट्रक गुजरात राज्यात गेला नाही. पुढील महिन्यात कर्नाटक व मध्य प्रदेशचा कांदा निघणार असून, तो अमरावती येथे दाखल होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्याला यानंतर चांगला भाव मिळू शकणार नसल्याचा अंदाज हा कावरे यांनी व्यक्त केला आहे.दरवर्षी गुजरात राज्यात अमरावतीतून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. पण, गेल्या तीन महिन्यांत एक ट्रक ही कांदा गुजरात राज्यात गेला नाही. त्या कारणाने आता आवकही कमी झाली व भावसुद्धा चांगला मिळण्याची शक्यता नाही- सतीश कावरे,कांदा व्यापारीआठ दिवसांपासून पाऊस असल्याने बटाटे व इतर भाजीपाल्याची आवक कमी आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून उचल नसल्याने भाव कमी आहे.चंदीराम आहुजा, ठोक विक्रेतागेल्या काही आठवड्यापासून आवक कमी झाल्याने सेससुद्धा कमी मिळत आहे. पंधरा ते वीस हजारांचा सेस आता आठ ते दहा हजार प्रतिदिनावर आला आहे- आर. पी. वानखडेविभागप्रमुख,फळ व भाजीबाजार