शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना रोखण्यासाठी गनिमी कावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:03 IST

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठीचा पाठपुरावा व परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या शेकडो जनांनी शनिवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शासननिषेधाच्या घोषणा देत मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशासनाला निवेदन : जिल्हाभरातून पंढरपुरात पोहोचणार एक हजार मराठा मावळेपरळी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठीचा पाठपुरावा व परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या शेकडो जनांनी शनिवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. यावेळी शासननिषेधाच्या घोषणा देत मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.परळी येथे मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी २५ हजारांवर मराठा बांधव चार दिवसांपासून उपोषण करीत आहेत. त्यांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री स्वारस्य दाखवित नाहीत. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा अमरावतीच्यावतीने परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकीय महापूजेपासून रोखण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार मराठा मावळे गनिमी काव्याने पंढरपुरात दाखल होतील व त्यांना मज्जाव करतील. यावेळी निर्माण होणाºया प्रसंगाला मुख्यमंत्रीच जबाबदार राहतील, असे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शासनाला ठणकावून सांगितले.सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास मराठा क्रांती मोर्चा अमरावतीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येईल. या आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी आणि वेळीच योग्य कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद आहे. निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील सकल मराठाजन उपस्थित होते.