शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

गुडेवारांचे कार्य ‘न भूतो न भविष्यती’

By admin | Updated: May 13, 2016 00:03 IST

आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे एका वर्षातील काम ‘न भूतो न भविष्यती’ असे आहे. त्यांच्या बदलीने विकासकामाला खीळ बसेल, म्हणून त्यांची बदली करू नये, ....

नगरसेवकांची एकजूट : बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंतीअमरावती : आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे एका वर्षातील काम ‘न भूतो न भविष्यती’ असे आहे. त्यांच्या बदलीने विकासकामाला खीळ बसेल, म्हणून त्यांची बदली करू नये, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती नगरसेवक प्रशांत वानखडे, सुनील काळे, प्रदीप बाजड यांनी गुरुवारी दिली. गुडेवारांची बदली थांबविणे, ही एक चळवळ झाली आहे. त्यात अमरावतीकर जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन एका मंचावर आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले. महापालिकेसह जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात सध्या गुडेवारांच्या बदलीचे वारे घोंगावत आहे. त्या पार्श्वभूमिवर बहुतांश नगरसेवकांनी गुडेवरांच्या समर्थनार्थ गुरुवारी पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेला अपक्ष नगरसेवक धिरज हिवसे, स्वीकृत नगरसेवक अमोल ठाकरे, राकाँचे सुनील काळे, काँग्रेसचे अ. रफिक, माजी उपमहापौर नंदू वऱ्हाडे, काँग्रेसचे अरूण जयस्वाल, प्रवीण मेश्राम, जयश्री मोरय्या, शिवसेनेचे राजू मानकर, राजेंद्र तायडे, इमरान अशरफी या नगरसेवकांसह अहमदखाँ, सुनील राऊत आदींची उपस्थिती होती. ७० टक्के नगरसेवकांच्या भावना गुडेवारांशी जुळल्या असून १६ मे रोजी होणाऱ्या आमसभेत गुडेवारांसंदर्भातील ठराव एकमुखाने पारित होईल, असा भक्कम आशावाद त्यांनी व्यक्त केला. गुडेवारांच्या बदलीमागे होणाऱ्या कारणाशी आम्हाला देणे-घेणे नाही. मात्र ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच गुडेवारांची बदली झाल्यास ते अमरावतीकरांसाठी अवलक्षण ठरेल, असेही या नगरसेवकांनी म्हटले. शिस्त, प्रशासनावरील भक्कम पकड आणि सोबतच अत्युच्च प्रामानिकतेने गुडेवार यांनी वर्षभरात शहरात उत्कृष्ट काम केले. शहरात होत असलेली कोट्यवधींची विकासकामे, त्याचा दर्जा, ही त्यांच्या कार्यतत्परतेची चुणूक आहे. अमरावतीकरांसह आम्हा लोकप्रतिनिधींनाही त्याची प्रचिती आल्याने ३ वर्षांचा पूर्ण कार्यकाळासाठी गुडेवार यांनी अमरावती महापालिका आयुक्तपदी कायम ठेवावे, अशी विनंती आपण मुख्यामंत्र्यांकडे केली आहे.