शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
3
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
4
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
5
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
6
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
7
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
8
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
9
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
10
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
11
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
12
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
13
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
14
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
15
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
16
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
17
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
18
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
19
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
20
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...

पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

रविवारी झालेल्या गारपीटग्रस्त परिसराची पाहणी करण्याकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दौरा केला.

बाजार समितीची पाहणी : व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करा

चांदूरबाजार : रविवारी झालेल्या गारपीटग्रस्त परिसराची पाहणी करण्याकरिता पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दौरा केला. पहली भेट त्यांनी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली. याप्रसंगी बाजार समितीमधील शेतकऱ्यांचा शेतमालाची गारपीट व वादळी पावसाने झालेली वाताहात पाहून पालकमंत्र्याचा राग अनावर झाला. त्यांनी हर्रासाच्या ठिकाणीच बाजार समितीचा गलथान कारभार बघून सचिवांची झाडाझडती घेतली. बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या ८००० पोती विक्रीकरिता होती. यात गहू, तूर, हरभरा, सोयाबीन, आदी मालाचा समावेश होता. अचानक आलेल्या गारपीट व वादळी पावसामुळे यातील ६००० पोत्यांची नासाडी झाल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा माल पावसात भिजल्याने ते माल व्यापारीही खरेदी करण्यास तयार होत नाही. यावेळी बाजार समितीही शेतकऱ्यांचा पाठीशी राहत नसल्याचे निदर्शनास आले. जे व्यापारी ओला माल खरेदी करणार नाही त्याचे परवाने त्वरित रद्द करण्याचे आदेश पालकमंत्री पोटे यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांचा विक्रीस आलेल्या मालाला पावसापासून पूर्ण संरक्षण मिळेल, अशी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे आदेश बाजार समिती सचिव मनीष भारंबे यांना दिले. ही व्यवस्था न झाल्यास कार्यवाहीस तयार रहा, अशी पालकमंत्र्यांनी तंबीही दिली. यानंतर पालकमंत्री जसापूर मार्गावरील श्रीराम भेले, आशिष कोरडे, बंड यांच्या शेतात पाहणी केली. त्यानंतर जसापूर मार्गे कोदोरी, दिलालपुर, माघाण, काजळी, देऊरवाडा, शिरजगाव कसबा या गावातील शेताची पाहणी करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यात. यावेळी प्रशांत चर्जन या शेतकऱ्यांने आपल्या शेतातील कांदा या पिकाचे नुकसानग्रस्त रोपटे पालकमंत्री यांना पाहणीकरीता आणले होते. याप्रसंगी पालकमंत्री पोटे, आ. बच्चू कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी राठोड, तहसीलदार शिल्पा बोबडे, तालुका कृषी अधिकारी राजीव मेश्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष मनोहर सुने, दिनेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष अशोक बनसोड, शहर अध्यक्ष किशोर मेटे, कोरडे, बाळासाहेब सोनार उपस्थित होते. आमदारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथाआमदार बच्चू कडू यांनी गारपीट झाल्यानंतर ताबडतोब स्वत: बेलोरा, नानोरी, सोनोरी, बोरज, जसापुर, माधान, दिलालपुर, कारंजा बहिरम, शिरजगांव कसबा आदि गावांना भेटी देवून शेतकऱ्यांचा व्यथा जाणून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारीशी संपर्क साधून शेतकऱ्यांना तत्काल मदतीची मागणी केली. तालुक्यातील सर्वच गारपीट ग्रस्त गावांचा दौरा करुन शेतकऱ्यांशी संपर्क साधणार आहे.