दर्यापूर : पालकमंत्री प्रविण पोटे यांन मार्कंडा येथे जाऊन वाघमारे परिवाराची सांत्वना भेट घेतली व मृत्तकाची आई कमलाबार्इंचे सांत्वन केले. यावेळी खल्लारचे ठाणेदार नरेंद्र पारवे, व तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडून पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. यावेळी वाघमारे परिवारांवत नैसगिक आप्पत्ती ओढाविली. एकाच परिवारातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे शासनाची मदत म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते कमला वाघमारे यांना ४ लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी कमलाबार्इंचे डोळे पणावले होते. या वेळी उपविभागीय अधिकारी ईब्राहीम चौधरी, विशेष कार्यकारी अधिकारी अनिल भटकर, पंचायत सभापती समिती रेखा वाकपांजर भाजपाचे दर्यापूर तालुका अध्यक्ष विजय मेंढे, नायब तहसिलदार प्रल्हाद धुर्वे, भाष्कर हिवराळे, राजू धुरंधर गावातील शेकडो नागरिक उपस्थिीत होते. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांची सांत्वना भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 00:08 IST