शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी काढला उपअभियंत्याचा कारभार

By admin | Updated: March 29, 2015 00:39 IST

स्थानिक राधानगरस्थित सिटी सेंटर संकुलातील अतिक्रमण काढताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या नावाचा उल्लेख महापालिका कर्मचाऱ्यांनी केल्याप्रकरणी शुक्रवारी ...

अमरावती : स्थानिक राधानगरस्थित सिटी सेंटर संकुलातील अतिक्रमण काढताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या नावाचा उल्लेख महापालिका कर्मचाऱ्यांनी केल्याप्रकरणी शुक्रवारी उपअभियंत्याचा १० मिनिटांत कारभार काढण्यात आला. या कारवाईने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील संकुल, प्रतिष्ठाने, हॉटेल्स, मंगल कार्यालये आदी समोरुन वाहनतळ गायब झाल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने वाहनतळ शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार शुक्रवारी सहायक संचालक नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाच्या संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. राधानगर येथील सिटी सेंटर संकुलातील वाहनतळ शोधमोहीम घेतली असता काही भागात अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आले. परिणामी हे बांधकाम पाडण्यात आले. परंतु सिटी सेंटर संकुलाच्या संचालकांनी थेट पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याशी संपर्क साधला. महापालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण पाडताना पालकमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला, असे नामदार पोटे यांना भ्रमणध्वनीवरुन कळविण्यात आले. ही बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या जिव्हारी लागली. पोटे यांनी थेट आयुक्त अरुण डोंगरे, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांच्याशी संपर्क साधून दीपक खडेकर कोण आहेत? अशी विचारणा केली. खडेकार यांच्याकडे असलेला अतिक्रमणाचा कारभार त्वरित काढून तसे आदेश दहा मिनिटांच्या आत निर्गमित करावे, असे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. त्यानुसार प्रशासनाने शुक्रवारी उपअभियंता दीपक खडेकार यांच्याकडे असलेला कारभार काढला. त्यानंतर कल्पतरु मार्केट, रघुनंदन मार्केट येथील पार्किंगवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. पालकमंत्र्यांसमोर पेशीअतिक्रमण काढताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा उल्लेख केल्याप्रकरणी कारवाईत सहभागी असलेल्या महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पेशी झाली. यावेळी बांधकाम व्यवसायाशी निगडित व्यावसायिक उपस्थित होते. ना. प्रवीण पोटे यांनी चुकीचे काम करताना माझ्या नावाचा उल्लेख करण्याची गरज नाही. अतिक्रमण काढताना संबंधित व्यक्तीला नोटीस देऊन अवगत करणे आवश्यक आहे. परंतु थेट अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आल्याची बाब पालकमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. एवढेच नव्हे, तर बांधकाम व्यावसायिकांना नियमबाह्य पद्धतीने कोणतेही काम करू नका, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी शहर अभियंता ज्ञानेद्र मेश्राम, सुहास चव्हाण, दीपक खडेकार, अजय विंचुरकर, गणेश कुत्तरमारे आदी उपस्थित होते.