बैठक वादळी : अंमलबजावणीवर भर अमरावती : पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आग्रही असलेल्या पालकमंत्र्यांनी शुक्रवार आक्रमक पवित्रा घेतला. योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनास्था दाखविणाऱ्या एका अधिकाऱ्याला ‘तुझा पगार किती’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. ३१ जुलैच डेडलाईन असल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी मिळवून देण्याच्या उद्देशाने पालकमंत्र्यांनी महसूल कृषी व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरम्यान जिल्ह्यात अल्पभूधारक अत्यल्पभूधारकांची संख्या किती, अशी विचारणा पालकमंत्र्यांनी केली. त्यावर फारशी माहिती नसलेल्या एका अधिकाऱ्याने योजनेबाबत अनास्था दाखविली. त्यावर पालकमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्याला पगार विचारला. ६५ हजार असे उत्तर आल्यानंतर पोटे भडकले. तुम्हाला महिन्याचे ६५ हजार मिळतात. शेतकऱ्यांना राब-राब राबूनही पुरेसा मोबदला मिळत नाही, दोन-तीन हजारांचा विमा हप्ता भरूनही शेतकऱ्यांना ४०-५० हजारांची मदत मिळत असेल तर त्यासाठी सांघिक प्रयत्न केले पाहिजेत, असे खडेबोल सुनावत पंतप्रधान पीक विमा योजना सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश पोटे यांनी दिले.
पालकमंत्री म्हणाले, तुझा पगार किती ?
By admin | Updated: July 18, 2016 01:20 IST