शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘पालकमंत्री हा खोटा माणूस!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:32 IST

रेंगाळलेल्या बेलोरा विमानतळाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार वीरेंद्र जगताप यांनी जोरदार तोफ डागली. पालकमंत्री हा खोटा माणूस आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप यांनी डागली तोफ : बेलोरा विमानतळाचा रेंगाळलेला मुद्दा तापला

आॅनलाईन लोकमतअमरावती : रेंगाळलेल्या बेलोरा विमानतळाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार वीरेंद्र जगताप यांनी जोरदार तोफ डागली. पालकमंत्री हा खोटा माणूस आहे. विमानतळ विकासाचे वचन खोटारडेपणाचे आहे. समृद्धी महामार्गासाठी ४३ हजार कोटी रुपये आहेत आणि विमानतळासाठी तीन वर्षांपासून ७५ कोटी उपलब्ध होऊ नये, हे न समजण्याजोगी जनता खुळी नाही, असा थेट वार जगताप यांनी ना. प्रवीण पोटे यांच्यावर केला. ते ‘लोकमत’शी बोलत होते.बेलोरा विमानतळ आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी स्वत: चालविणार आणि विकासासाठी दोन टप्प्यांत ७५ कोटी देणार, असा निर्णय गुरुवारी राज्य सरकारने मंत्रिमंडळात घेतला. शासन या निर्णयाचे श्रेय घेवू इच्छित असल्याच्या पार्श्वभूमीवर जगताप यांनी तोफ डागली. गत वर्षभरापासून जळू ते बेलोरा वळण रस्ता (बायपास) करिता १५ कोटी निधी देऊ शकले नाही, ते ७५ कोटी काय देणार? सरकारचा हा निर्णय म्हणजे खोटारडेपणा होय. राज्यात भाजपचे सरकार असेपर्यंत बेलोरा विमानतळाचा विकास शक्य नाही. पुढील वर्षी बेलोरा विमानतळाहून छोटी विमाने सुरू करणे ही पालकमंत्र्यांची थाप होय, असा थेट आरोप त्यांनी केला.काँग्रेसच्या काळातच विमानतळ विकासाला जमीन मिळवून दिली आणि काँग्रेसचे सरकारच येत्या काळात विमाने सुरू करेल, असा टोला आ. जगताप यांनी लगावला. विमानतळ विकासासंदर्भात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी घेतलेल्या बैठकी जगतापांनी निरर्थक ठरविल्यात. माझ्या मते, पालकमंत्री प्रभावशून्य आहे. वर्षभरात ते बेलोरा विमानतळाचा वळण रस्ता निर्माण करू शकले नाही; आता विमानांचे उड्डाण होईल, हे कुणालाही पटणारे नाही, असा आसूड त्यांनी ओढला. विमानतळ विस्तारीकरणात बडनेरा ते यवतमाळ मार्ग बंद होणार होते. मी स्वत: पुढाकार घेऊन पाच गावांच्या शेतकºयांची जमीन मिळवून दिली. मात्र, बायपासचे काम पूर्ण होण्यास अजूनही वर्षभराचा कालावधी आहे. त्यामुळे बेलोरा विमानतळाहून येत्या सहा ते आठ महिन्यांत मोठी विमाने ‘टेक आॅफ’ घेतील, हा पालकमंत्र्याचा दावा तद्दन खोटा आहे. आताही विमानतळावर छोटी विमाने दिवसाच उतरतात. विमानतळाची धावपट्टी १३७२ मीटरवरून १८५० मीटर लांब होणे भाजप सरकारच्या काळात शक्यच नाही. ते काँग्रेस सरकारच करू शकेल. त्यामुळे पालकमंत्र्यांनी थापा मारणे बंद कराव्यात. शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असा सल्ला आ. जगतापांनी दिला.जिल्हयाची खऱ्या अर्थाने विकासाकडे झेप - पालकमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. केंद्रीय मार्ग निधी व बांधकाम विभागाकडून सुरू झालेल्या रस्ते निर्मितीमुळे विकासाची घोडदौड सुरू आहे. बेलोरा विमानतळाचा विकास अनेक वर्षांपासून रखडलेला होता. मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि त्यांनी निर्णय घेऊन बेलोरा विमानतळ विकासाचा शब्द पाळला. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीमुळे बेलोरा विमानतळावरून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक असेल व अमरावती हवाईमार्गाने जोडले जाणार असल्याने औद्योगिक वसाहतीत अधिकाधिक उद्योग येऊन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. इतर शहरांप्रमाणेच आता बेलोरा विमानतळावरून लवकरच विमानांची ये-जा सुरू होऊन अमरावतीच्या विकासात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

विमानतळाला मिळाले ७५ कोटीडिसेंबर २०१८ पर्यंत विमानांचे ‘टेक आॅफ’: मुख्यमंत्र्यांची अमरावतीकरांना नववर्षाची भेट

गुरुवार, १४ डिसेंबर रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बेलोरा विमानतळाचा विकास महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून करण्यास मान्यता प्रदान आली तसेच ७५ कोटी रुपये हे दोन टप्प्यांत दिले जाणार असून, १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीकरांना खऱ्या अर्थाने ही नववर्षाची भेट दिली, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितलबेलोरा विमानतळावरून डिसेंबर २०१८ पर्यंत विमानांचे ‘टेक आॅफ’ होईल. यासंदर्भात २१ नोव्हेंबर रोजी ना. पोटे यांनी अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात बैठक घेतली. त्यानंतरच खºया अर्थाने विमानतळाच्या विकासाला गती मिळाली आहे. प्रारंभी भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून बेलोरा विमानतळ विकसित केले जाणार होते. काही तांत्रिक कारणांमुळे आता महाराष्ट्र शासनाने बेलोरा विमानतळ स्वत: विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची विशेष प्रकल्प वाहक (ये-जा) म्हणून नियुक्ती केली आहे. विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ कंपनीला प्रस्ताव देण्यात आला आहे.बेलोरा विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीची लांबी १३७२ मीटर असून, ती १८५० मीटर करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळ विकासासाठी ७५ कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केली आहे. यात विमानतळ हाताळण्याच्या क्षमतेची टर्मिनल इमारत उभारणे, फायर स्टेशन व एटीसी टॉवर, अप्रन (एपीआरओएन) क्षमतेत वाढ करणे, तीन एटीआर व एक एअर बस बोइंग, बडनेरा-यवतमाळ बाह्य वळण रस्ता, रस्त्यालगतच्या विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, विमानतळ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ यांना जोडणाºया चौपदरी रस्त्याचे काम, विमानतळास पाणीपुरवठा व्यवस्था आदी कामांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांनी विमानतळाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले.