शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

गट, शहर साधन कें द्र शिक्षण, प्रशिक्षण संस्थेकडे

By admin | Updated: October 16, 2014 23:18 IST

सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना व शिक्षकांना शैक्षणिक आधार देण्यासाठी गट शहर समूह साधन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या केंद्राचे कामकाज जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या

अमरावती : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना व शिक्षकांना शैक्षणिक आधार देण्यासाठी गट शहर समूह साधन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या केंद्राचे कामकाज जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या नियंत्रणात चालविण्यात येत होते. मात्र आता शहर व ग्रामीण भागातील सर्वशिक्षा अभियानांतर्गत गट साधन केंद्राचे कामकाज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत चालविण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने २५ सष्टेंबर रोजी सर्व जिल्हा परिषदांना आदेश दिले आहेत. सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना व शिक्षकांना शैक्षणिक आधार देण्यासाठी गट शहर समूह साधन केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. यासाठी तालुका स्तरावर गट साधन केंद्र व महापालिकांमध्ये शहर साधन केंद्राची निर्मिती या कामासाठी केली होती. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आटीई अ‍ॅक्ट २००९) ची अंमलबजावणी राज्यभरात १ एप्रिल २०१० पासून सुरू झालेली आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन व विकास मंत्रालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गटसाधन, शहरसाधन केंद्राची व पदाची पुनर्रचना केली. ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे ३५१ ठिकाणी गटसाधन केंद्र व शहरी भागामध्ये १० ते १५ समूह साधन केंद्रांसाठी एक याप्रमाणे ५६ शहरसाधन केंद्र अमरावतीसह राज्यभरातील जिल्हा परिषद व महापालिकांमध्ये कार्यरत आहेत. सुधारित निकषाच्या आधारे केंद्र शासनाने सन २०१४/ २०१५ च्या सर्वशिक्षा अभियान वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक ३५१ गटसाधन केंद्र व शहरसाधन केंद्रासाठी आवश्यक तरतूद केली आहे. या गट /शहरसाधन केंद्रात प्रत्येक विषयाकरिता एक साधन व्यक्ती असे सहा विषय साधन व्यक्ती आणि समावेशित शिक्षणांतर्गत २ विषय साधन व्यक्तीच्या कार्यरत पदांना मंजुरी देण्यात आली आहे. वर्ग १ ते ८ करिता सामान्यत: मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, (इतिहास व भूगोल) या विषया करिता विषयतज्ज्ञांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. सन २०१४/ २०१५ जिल्हा परिषद व महापालिकांमध्ये कंत्राटी पध्दतीने २०३१ विषय साधन व्यक्ती व ८१४ समावेशित शिक्षणाचे विषय साधन व्यक्तीत कार्यरत आहेत. राज्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची निर्मिती ही प्रामुख्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्यादुष्टीने शाळा व शिक्षणाच्या समृध्दीसाठी केली आहे. गट/ शहरसाधन केंद्राचे कार्य हे शैक्षणिक कामकाजाशी संबंधित असल्याने त्याच्या कार्याच्या संनियंत्रणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाकडे देऊन त्यांच्याव्दारा सातत्याने मार्गदर्शन देण्यासाठी याबाबतच्या शासन निर्णयानुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत गट/ शहरसाधन केंद्र शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी संलग्न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे गट/शहरसाधन केंद्राचे सक्षमीकरण व त्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी समन्वयन करणे सोईचे होणार आहे. त्यादुष्टीने गट/ शहरसाधन केंद्राचा प्रभावी उपयोग करून घेण्यासाठी राज्यभरातील ४०७ गट/ शहरसाधन केंद्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेस संलग्न करण्यात आले आहेत.