शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत दीड मीटरने तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:30 IST

गतवर्षीचे कमी पर्जण्यमान व सध्या वारेमाप होत असलेला भूजलाचा उपसा व भूजल व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजल पातळी दीड मीटरने कमी झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा मार्चअखेर सर्वच तालुक्यातील १७१ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरने भूजलात कमी आलेली आहे.

ठळक मुद्देमार्चअखेरचे निरीक्षण : अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरची घट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीचे कमी पर्जण्यमान व सध्या वारेमाप होत असलेला भूजलाचा उपसा व भूजल व्यवस्थापनाचा अभाव यामुळे जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजल पातळी दीड मीटरने कमी झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा मार्चअखेर सर्वच तालुक्यातील १७१ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९४ मीटरने भूजलात कमी आलेली आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बेसॉल्ट प्रकारच्या कठीण पाषाणाचा आहे व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. यंदा सरासरी ३४ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजलाचे अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी व तिवसा या पाणलोट क्षेत्रात ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. उर्वरित पाणवहन क्षेत्रातील (रन आॅफ झोन) निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.भूजलात सर्वाधिक कमी असलेल्या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील आठ (१) च्या तरतुदीनुसार पिण्याचे पाण्याचे स्त्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे.अतिविकशित पाणलोट क्षेत्रात बारमाही सिंचन जास्त प्रमाणात असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या भागातील भूजल साठा झपाट्याने कमी होत असल्याचे निरीक्षण आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील आठ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल असल्याची माहिती आहे.आता १,१३४ विहिरींद्वारे भूजलाची नोंदजिल्ह्यात भूशास्त्रीय परिस्थितीनुरूप १,१३४ विहीरी प्रस्थापीत करण्यात आल्यात.जलस्वराज प्रकल्पातंर्गत आता जलसुलक्षक व ग्रामसेवकांवर विहिरींची नोंद घेण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. दर महिण्याला या विहिरींच्या भुजलाची नोंद ठेवल्या जाणार असल्याने भूजल मूल्यांकन त्वरेने होण्यास मदत होणार आहे. यामध्ये नोंदीसाठी मोबाईल इंटरनेटचा वापर होईल.भूजल घटनिहाय तालुका स्थितीजिल्ह्यात मार्चअखेर भूजल पातळीत सरासरी १.५० मीटरने कमी आली. यामध्ये सहा तालुक्यात ० ते एक मीटरपर्यत, पाच तालुक्यात एक ते दोन मीटरपर्यत, दोन तालुक्यात दोन ते तीन मीटरपर्यत तर एक तालुक्यात तीन मीटरपेक्षाअधिक भूजलात कमी आलेली आहे.