शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उपविधी दुरुस्तीमुळे बाजार समिती संचालकांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:02 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : पणन विभागाने बाजार समित्यांच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करून दहा गुंठे जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल केला. त्यामुळे आजवर प्रस्थापित असणाऱ्या ग्रामपंचायत व सोसायटी मतदारसंघाची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. बाजार समितीच्या उपविधी दुरुस्तीनंतर २१ सदस्यांऐवजी आता १८ सदस्यांचे संचालक मंडळ राहणार आहे. अध्यादेशानंतर निवडणुकीस पात्र बाजार समित्यांच्या मतदार याद्या नव्याने ...

ठळक मुद्देआता १८ संचालकांचे मंडळ : ग्रामपंचायत, सोसायटी मतदारसंघाची मक्तेदारी मोडीत

आॅनलाईन लोकमतअमरावती : पणन विभागाने बाजार समित्यांच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करून दहा गुंठे जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल केला. त्यामुळे आजवर प्रस्थापित असणाऱ्या ग्रामपंचायत व सोसायटी मतदारसंघाची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. बाजार समितीच्या उपविधी दुरुस्तीनंतर २१ सदस्यांऐवजी आता १८ सदस्यांचे संचालक मंडळ राहणार आहे. अध्यादेशानंतर निवडणुकीस पात्र बाजार समित्यांच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचे निर्देश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत.प्रचलित पद्धतीनुसार बाजार समितीमध्ये २१ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. यामध्ये विविध सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, प्रक्रिया मतदारसंघ, व्यापारी व हमाल मतदारसंघासह एकूण २१ संचालकांचा यामध्ये समावेश राहायचा. यामध्ये शेतकऱ्यांना कुठेही स्थान नव्हते. राज्य शासनाने प्रथम अध्यादेश काढून बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना मताधिकार दिला व या निवडणुकीतील प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढली.दहा आर शेतधारणा असलेल्या व पाच वर्षात किमान तीन वेळा शेतमाल बाजार समित्यांमध्ये शेतमाल विकलेल्या शेतकऱ्यांना अध्यादेशानुसार मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे किमान १५ शेतकरी संचालक बाजार समित्यांवर निवडले जाणार आहेत. याशिवाय अडते-व्यापारी यांचे दोन, हमाल व तोलाईदार यांचे दोन असे १८ सदस्यांचे संचालक मंडळ आता पुढच्या निवडणुकीपासून राहणार आहे. सध्या पाच कोटींपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक जिल्हा उपनिबंधक घेतात. त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतली जाते. मात्र, आता यापुढील निवडणूक राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.असे राहणार नवीन संचालक मंडळबाजार समित्यांमध्ये आता शेतकऱ्यांचे १५ संचालक राहणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील १०, महिला प्रतिनिधी २, अनुसूचित जाती १, इतर मागास वर्ग १ व भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गातील १ संचालक राहणार आहे. हमाल- तोलाईदार १, अडते-व्यापारी १ तसेच जिल्हा उपनिबंधक स्वीकृत १ असे १८ सदस्यांचे संचालक मंडळ राहणार आहे.असे आहे प्रचलित संचालक मंडळसद्यस्थितीत सोसायटी मतदारसंघातील ११ पैकी सर्वसाधारण ७, महिला २, इतर मागासवर्गीय १, भटक्या-विमुक्त जाती १ तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ पैकी आर्थिक दुर्बल १, अनुसूचित जाती १, हमाल-तोलाईदार १, अडते-व्यापारी २, प्रक्रिया संस्था १, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी १, पंचायत समिती १ व जिल्हा उपनिबंधक १ असे संचालक मंडळ अस्तित्वात आहे.