शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाआधीच भावी वधूविरुद्ध वराची पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 15:26 IST

Amravati News ती लग्न करणार.. की करणार नाही.. या संभ्रमात असलेल्या एका युवकाने आपल्या भावी पत्नीविरुद्ध थेट पोलिसात तक्रार नोंदवून टाकल्याची घटना चांदूररेल्वे येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: ती लग्न करणार.. की करणार नाही.. या संभ्रमात असलेल्या एका युवकाने आपल्या भावी पत्नीविरुद्ध थेट पोलिसात तक्रार नोंदवून टाकल्याची घटना चांदूररेल्वे येथे घडली. एरव्ही वराविरुद्ध तक्रारीच्या घटना घडलेल्या दिसतात. मात्र वधूविरुद्धच्या तक्रारीची ही घटना आगळीच असल्याने या परिसरात त्याची चर्चा होते आहे.

यासंदर्भातील हकिकत अशी की, महालक्ष्मीनगरातील ३२ वर्षीय युवकाचे मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या २१ वर्षीय तरुणीशी लग्न जुळले. दोघांचा साखरपुडाही झाला. मात्र काही काळानंतर त्या वधूने व तिच्या प्रियकराने भावी वराला गाठून आपण लग्न करणार असल्याचे सांगितले. हा धक्का सहन न होऊन वराने सारी माहिती घरच्यांना दिली. दोन्ही कुटुंबात चर्चा झाली. अखेरीस वधू या लग्नाला तयार असल्याचा निरोप तिच्या आईवडिलांनी दिल्याने सगळ््यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता आपले लग्न होणार या आनंदात असलेल्या वराने भावी वधूला १८ हजारांचा मोबाईलही भेट म्हणून दिला.

एवढे सगळे घडल्यानंतर लग्नाच्या अगदी काही दिवस आधी वधूने पुन्हा लग्नाला नकार दिला. यावेळी मात्र वर व त्याच्या घरच्यांचा संताप झाला. दोन्ही कुटुंबात कडाक्याची भांडणे झाली आणि वराने थेट पोलिस ठाणे गाठून वधूविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी हा गुन्हा २७ जून रोजी दाखल केला असून, तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी