शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

गुरुकुंजात गुरुपौर्णिमेचा दिमाखदार सोहळा

By admin | Updated: August 1, 2015 01:35 IST

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर शुक्रवारी हजारो गुरुदेवप्रेमींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुस्थानी ठेवून आदरांजली अर्पण केली.

हजारो भाविकांची उपस्थिती : राष्ट्रसंतांच्या जागविल्या स्मृती, महासमाधीला अभिषेक गुरुकुंज मोझरी : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर शुक्रवारी हजारो गुरुदेवप्रेमींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुस्थानी ठेवून आदरांजली अर्पण केली. दिमाखदार सोहळ्यात तमाम गुरुदेव प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. ब्रह्ममुहूर्तावरन पहाटे ४ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीला अभिषेक करण्यात आला. गुरुदेवप्रेमींनी गुरुमाऊ लीला आदरांजली वाहताना गुरुनामकी नैय्या हमें भव-दु:खसे तरवायगी ।गुरु का चरणरज ही हमे, मन-भौर से हरवायगी ।।गुरु प्रेमी बरखा हमें, सत् ज्ञान को बलायगी ।गुरु की कृपा हमका हमारे, सौख्य मे मिलवायगी ।।गुरुकृपा नही पडी सडकपर मेरा मै जानू । बीज न बोये जाते खडकपर मेरा मै जानू ।। तुकड्यादास म्हणे ही सांगड कोटी जन्माची । तरीच फळे सद्गुरू कृपा अंतज्जानाची ।। गुरु हाडामासांचा नोहे। गुरु नव्हे जाती-संप्रदाय। गुरू शुध्द ज्ञानतत्त्वचि आहे। अनुभवियांचे ।।अशी एकापेक्षा एक सुमधुर व सुहाय्य वंदनाने राष्ट्रसंतांची भजने गायिली. यामध्ये आबालवृध्द सहभागी झाले होते. शंकाच्या ध्वनी नादने व राळ-उदाच्या धुपाने वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमानंतर आश्रमाच्या महाव्दारावर नवी कोरी भगवी पताका अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यात्म विभागप्रमुख राजाराम बोथे यांनी फडकविली. राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे पूजन हभप दादा महाराज चरडे, भानुदास कराळे, सचिन कैपिल्यवार, माजी उपसर्वाधिकारी दामोधर पाटील, गुलाब खवसे, सूर्यप्रकाश जयस्वाल, रघुनाथ वाडेकर, यांच्या हस्ते करण्यात आले. उपसर्वाधिकारी रुपराव वाघ यांच्या हस्ते राष्ट्रसंताच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामुदायिक ध्यानावर सर्वाधिकारी हभप प्रकाश वाघ यांनी चिंतन व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या असंख्य गुरुदेवप्रेमींनी गुरुवारपासूनच गुरूकुंज आश्रमात हजेरी लावली होती. गुरूमाऊलीला शब्द सुमनांनी आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी दिवसभर महासमाधी स्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून भव्य वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले होते. सकाळी ९ ते १० दरम्यान गायक शंकर इंगळे, रघुनाथ करडीकर, माधव करडीकर, श्रीकृष्ण दळवी यांनी खंजेरी भजने सादर केली. कार्यक्रमाला अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जर्नादनपंत बोथे, हभप विलासराव साबळे, तबलानवाब नीलेश इंगळे, सुहास टप्पे, महिला मंडळाच्या सर्व महिला कार्यकर्त्या, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जीवन व आजीवन कार्यकर्ते, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नेत्रदीपक नियोजन हभप विलास साबळे यांच्या अध्यक्षतेखाली उध्दव वानखडे, अरविंद राठोड, गायक किशोर अगडे, भीमराव कांडलकर, अर्चना टप्पे, जया सोनारे, पुष्पा हांडे, अजय चव्हाण, रुपेश राऊ त, अमोल बांबल, सुभाष सोनारे यांनी केले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीला विविध फुलांनी सजविले होते.