शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीनरन मॅराथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST

भातकुली नगरपंचायतमध्ये ग्रीन मॅरेथॉन वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली नगरपंचायत व खोलापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमानाने खोलापूर येथे रविवारी ‘ग्रीनरन’ ...

भातकुली नगरपंचायतमध्ये ग्रीन मॅरेथॉन

वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली नगरपंचायत व खोलापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमानाने खोलापूर येथे रविवारी ‘ग्रीनरन’ स्पर्धा घेण्यात आली. एमओ डॉ.अक्षय निकोसे यांनी उद्घाटन केले. भातकुली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य उपस्थित होत्या. खोलापूर-बोरखडी या मार्गावर ७.२ किलोमीटर अंतराच्या या रनिंगमध्ये देविदास सनके या युवकाने प्रथम क्रमांक पटकाविला. विशाल खेडकर व ऋषिकेश इंगळे हे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

--------------------

फोटो पी २४ चिखलदरा

चिखलदऱ्यातही धावले १५६ युवक-युवती

चिखलदरा : येथे रविवारी सकाळी सात वाजता ‘ग्रीनरन २०२१’अंतर्गत ७.२ किमी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. यात १५६ स्पर्धकांनी भाग घेतला. विजेत्यांना पारितोषिक, तसेच प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार माया माने, नगराध्यक्ष विजय सोमवंशी, ठाणेदार आकाश शिंदे, सपोनि शहाजी रूपनर, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी नगरपालिका महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी हजर होते.

---------------------

फोटो पी २४ दर्यापूर

दर्यापूरमध्ये लखन बुंदिले प्रथम

दर्यापूर : स्थानिक पोलीस व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ७.२ किमी अंतराच्या धावण्याच्या स्पर्धेत एकूण २८१ स्पर्धक सहभागी झाले. यात हनुमान व्यायाम क्रीडा मंडळाचा लखन बुंदेले प्रथम, अस्लम शहा द्वितीय व लक्ष्मण बायवार यांनी तृतीय क्रमांक पटकाविला, तसेच महिलांमधून आकांक्षा वगारे, साक्षी ढवळे व साक्षी शंके या विजेत्या ठरल्या. एसडीपीओ सुनील मोरे, तहसीलदार योगेश देशमुख, ठाणेदार प्रमेश अत्राम, मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. संचालन अनिल भारसाकळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरपरिषदेचे राहुल देशमुख यांनी केले.

--------------------

चांदूरबाजारमध्ये ३५५ स्पर्धक सहभागी

चांदूरबाजार : येथील ग्रीनरन स्पर्धेत ३५५ स्पर्धक सहभागी झाले. नगराध्यक्ष नितीन कोरडे यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी तहसीलदार धीरज स्थूल, ठाणेदार सुनील किनगे, मुख्याधिकारी पराग वानखेडे उपस्थित होते. ग्रीनरन स्पर्धेतील सात किलोमीटर धावण्यात सौरभ पवार (आसेगाव) प्रथम, राज गुजर (आसेगांव) द्वितीय, तर सुमित इंगळे (तुळजापूर गढी) यांनी तृतिय क्रमांक पटकावला. पाच किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक सुमित इंगळे (तुळजापूर) द्वितीय क्रमांक सिद्धार्थ पळसपगार (फुबगाव), तर तिसरा क्रमांक अंकुश वºहाडे (फुबगांव) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिलांच्या पाच किलोमीटर स्पर्धेत प्रथम वृशाली बोराळकर (नजरपूर), द्वितीय दर्शना घोरमाडे (नजरपूर) व तृतीय क्रमांक मोनिका वाडवे धामणगाव तृतीय स्थानावर राहिली. महिलांच्या तीन किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक गौरी इंगळे (तुळजापूर), द्वितीय रश्मी कोरे (हिरुर पुर्णा), तर तृतीय क्रमांक रुचिका सापधारे (चांदूरबाजार) हिने पटकावला. शालेय मुलांसाठी आयोजित तीन किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रज्ज्वल कोरडे (वणीज्य) द्वितीय वैष्णव गोहत्रे (माधान) व तृतीय क्रमांक प्रथमेश नंदकिशोर अमझरे (देऊरवाडा) यांनी पटकावला.

------------------

फोटो पी २५ चांदूररेल्वे

मयूर, मनीषा, मोहित, सृष्टी यांनी बाजी मारली

चांदुर रेल्वे: येथे पोलीस व पालिकेच्या वतीने ग्रीनरन मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्थानिक जि.प. हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धेला सुरुवात झाली. विविध गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी यांनी हिरवी झेंडी दिली. मयूर गजभिये, योगेश चांदेकर, मनीषा पवार, राधिका ठाकूर, मोहित वंजारी, विशाल झझाडे, सृष्टी पवार, भावना वडतकर या स्पर्धकांनी पारितोषिक पटकाविले. मुख्याधिकारी मेघना वासनकर, तसेच ठाणेदार मगन मेहते यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

---------------