शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सोयाबीनला मूग, उडीद, ज्वारीचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकासाठी २ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. मागील वर्षी २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली होती. त्यामुळे यंदा किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची वाढ होण्याची शक्यता असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्या वेळी झालेल्या अतिपावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्दे३० हजार हेक्टरने क्षेत्रवाढ अपेक्षित : बियाण्यांचा तुटवडा आल्यास संभाव्य उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांची काही प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास सोयाबीनला मूग, उडीद व ज्वारीचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय आंतरपीकदेखील घेता येऊ शकते, अशी माहिती कृषी विभागाने दिली.यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकासाठी २ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. मागील वर्षी २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली होती. त्यामुळे यंदा किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची वाढ होण्याची शक्यता असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्या वेळी झालेल्या अतिपावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दाणा बारीक झाला व उत्पादनातदेखील घट आलेली असल्याने यंदाच्या हंगामात बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पेरणीच्या काळात सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता नसल्यास वा किमतीमध्येही वाढ झाल्याने एखाद्या शेतकऱ्याला अडचण आल्यास अन्य पिकांचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मूग, उडीद व ज्वारीची पेरणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत करता येऊ शकते. ज्वारीमध्ये मूग व उडदाचे आंतरपीक घेता येते तसेच ज्वारीला भावदेखील आहे. कडब्याला मागणी व अधिक दर असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.नांदगावमध्ये सर्वाधिक, वरुडमध्ये किमान क्षेत्रसोयाबीनसाठी २ लाख ६८ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. यामध्ये नांदगाव खंडेश्वर ४६ हजार २००, अमरावती ३२ हजार ५००, चांदूर रेल्वे २६ हजार, भातकुली २५ हजार, चांदूर बाजार २२ हजार ८००, तिवसा २१ हजार, धामणगाव रेल्वे १८ हजार ५००, मोर्शी १८ हजार २००, दर्यापूर १२ हजार ८००, अचलपूर १२ हजार ७००, चिखलदरा ११ हजार ५००, अंजनगाव सुर्जी ११ हजार, धारणी ९ हजार ३०० व वरूड तालुक्यात ५०० हेक्टर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात पेरणी करण्यात येणार आहे.असे आहे ज्वारीचे व्यवस्थापनखरीप ज्वारीची पेरणी साधारणपणे २५ जून ते १५ जुलै या दरम्यान करता येते. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव होतो. पेरणीसाठी हेक्टरी ७.५ किलो संकरित व १० किलो सुधारित वाणाचे बियाणे वापरावे. पेरणी तिफणद्वारे दोन चाळ्यांच्या पाभरीने करावी व दोन ओळींमध्ये ४५ सेंमी अंतर असावे. पहिली विरळणी १० ते १२ व दुसरी २० ते २२ दिवसांनी करावी. ज्वारी रासायनिक खताला चांगला प्रतिसाद देत असल्याने कृषितज्ज्ञांच्या सल्याने खतांची मात्रा द्यावी. ज्वारीमध्ये मूग, उडीद व तुरीचे आंतरपीकदेखील घेता येत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.सोयाबीन क्षेत्रवाढीची शक्यता असली तरी शेतकरी घरचे बियाणे प्रक्रियेद्वारे वापरत असल्याने तुटवडा भासणार नाही. सोयाबीनला ज्वारी, मूग व उडीद तसेच आंतरपीक हा पर्याय उपलब्ध आहे.- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती