शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ उड्डाणपूल भूसंपादनाला मंत्रालयाची हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:25 IST

राजापेठ उड्डाणपुलाच्या अनुषंगाने भूसंपादनास नगरविकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. महानगरपालिकेची जबाबदारी असलेल्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आवश्यक ६.६४ कोटींच्या प्रस्तावाला नगरविकास मंत्रालयाने गुरुवारी हिरवी झेंडी दिली. भूसंपादनास असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमिवर या प्रशासकीय मान्यतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देटीडीआर घेण्याची मुभा : महापालिकेच्या जबाबदारीवर शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ उड्डाणपुलाच्या अनुषंगाने भूसंपादनास नगरविकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. महानगरपालिकेची जबाबदारी असलेल्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी आवश्यक ६.६४ कोटींच्या प्रस्तावाला नगरविकास मंत्रालयाने गुरुवारी हिरवी झेंडी दिली. भूसंपादनास असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमिवर या प्रशासकीय मान्यतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.महाराष्टÑ सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत उड्डाणपुलाच्या भूसंपादनास महापालिकेने मान्यता मागितली होती. त्यानुसार भूसंपादनास लागणाऱ्या ६.६४ कोटींपैकी ४.६४ कोटी राज्यशासन तर १.९९ कोटी रुपये महापालिकेला स्वहिस्सा म्हणून द्यावा लागेल. राजापेठ उड्डाणपूलही रेल्वे प्राधिकरणाची वैधानिक जबाबदारी नसल्याने जागा संपादित करून देण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे नगरविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.उड्डाणपुलासाठी बेलपुराकडे उतरणाºया पोचमार्गासाठी आवश्यक भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध आहे. कंवरनगर व बेलपुराकडे उतरणाऱ्या उड्डाणपुलासाठी भूसंपादन आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका, जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्रालयाकडे आक्षेप नोंदविण्यात आले. मात्र, भूसंपादनाशिवाय उड्डाणपुलाचे संपूर्ण काम शक्य नसल्याची बाब पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आली. जागेचे संपादन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यास मंजुरी मिळाली.हो... जबाबदारी आमचीच!नागरी क्षेत्रातील रेल्वे उड्डाणपूल आरओबीच्या कामाच्या अनुषंगाने रेल्वे प्राधिकरणाची वैधानिक जबाबदारी नसलेल्या जागा संपादित करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. महापालिका आयुक्तांनी ती जबाबदारी प्रमाणित केल्याचे नगरविकास मंत्रालयाने म्हटले आहे. भूसंपादनासाठी निधी कोणी उभारायचा, यावरून रेल्वे व महापालिका यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. ते संपुष्टात आले आहे....तर विकास आराखड्यात बदलउड्डाणपुलासाठी त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिकांनी टीडीआर देऊन सदर जागा भूसंपादित करणे व त्यासाठी आवश्यक तेथे विकास आराखड्यात बदल करणे आवश्यक आहे. टीडीआर वा डीपीत बदल करूनही जागा संपादित करणे शक्य नसल्यास अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ते प्रमाणित करणे आवश्यक करण्यात आले आहे.राज्य शासनाच्या धोरणानुसार, उड्डाणपुलासाठी भूसंपादन, भूसंपादनासाठी द्यावयाच्या मोबदल्याची परिगणना करताना ती राज्य शासनाच्या भूसंपादनातील दरानुसार करण्यात आल्याची खातरजमा महापालिका आयुक्तांना करावी लागेल.