शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

१९९१ च्या महापुराच्या आठवणी अजूनही ताज्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:12 IST

मोवाड महापुराने ३० जुलै १९९१ रोजी धुवून नेले, तर वरूड तालुक्यातदेखील अनेक गावे पाण्याखाली आली होती. कुणी आई, बहीण, भाऊ, मुलगा, तर कुणी बाप गमावला. कुठे अख्खे कुटुंब वाहून गेले. २७ वर्षांनंतरही तो दिवस आठवला की, अनेकांच्या डोळ्यांना धारा लागतात.

ठळक मुद्देमोवाड : २७ वर्षांनंतरही आप्तांच्या आठवणीने डोळ्यांच्या कडा होतात ओल्या

गजानन नानोटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसला : मोवाड महापुराने ३० जुलै १९९१ रोजी धुवून नेले, तर वरूड तालुक्यातदेखील अनेक गावे पाण्याखाली आली होती. कुणी आई, बहीण, भाऊ, मुलगा, तर कुणी बाप गमावला. कुठे अख्खे कुटुंब वाहून गेले. २७ वर्षांनंतरही तो दिवस आठवला की, अनेकांच्या डोळ्यांना धारा लागतात.मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील मोवाड हे वर्धा नदीच्या तीरावरील गाव. १९९१ मध्ये ३० जुलैच्या मध्यरात्री एकाएकी मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला महापूर आला आणि हजारो लोकांना जलसमाधी मिळाली. घरे नेस्तनाबूत झाली. साहित्य पाण्यात वाहून गेले. बँका, सरकारी कार्यालयेसुद्धा कागदपत्रासह स्वाहा झाली होती. मृतदेहांचा सडा पडलेला होता. यात आई, बहिणी, बाप, मुलगा, भावकीतील आपला कोण, याचा शोध आणि आक्रोश सर्वत्र होता.मोवाड वगळता अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या वरूड तालुक्यालासुद्धा महापुराचा फटका बसला. वरूड, गणेशपूर, पुसला, लिंगा, आमनेर, मोर्शी (खुर्द) पोरगव्हाण, देऊतवाडा, घोराड, एकदरासह या नदीतीरावरील अनेक गावांचे गायरान झाले. यातून वाचलेल्यांना दरवर्षी जुलै महिन्यात धडकी भरते. आक्रोश, जीव वाचविण्याची धडपड आणि आप्तांच्या शोधासाठी पायपीट सर्व डोळ्यांपुढे तरळून जाते.ती काळरात्र अजूनही अंगावर शहारे आणते. अंगावर असलेले कपडे घेऊनच वाट मिळेल तिकडे लोक धावत होते. आम्हीसुद्धा आमच्या परीने होईल ती मदत मोवाडवासीयांना पोहचवून माणुसकीचा संदेश दिला होता.- रमेश श्रीराव,माजी सरपंच, पुसला