शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान

By admin | Updated: February 6, 2016 00:21 IST

अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

आश्वासन : शिक्षक महासंघाचा पाठपुरावाअमरावती : अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याविषयाचे महत्त्व लक्षात आणून दिले. यासाठी अघोषित शाळांनी विहित नमुन्यात आपल्या शाळांची सविस्तर माहिती तत्काळ शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आवाहन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केले आहे. शेखर भोयर यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या ‘निर्धाराचा लढा’ या आंदोलनाला गुरुवारी भेट दिली. त्यात विना अनुदानित शाळांच्या न्यायासाठी व शिक्षकांच्या अस्तित्वाच्या लढाईत सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिष्टमंडळामध्ये आ. ना.गो. गाणार, आ. भगवान साळुंखे, तात्यासाहेब म्हसकर, खंडेराव जगदाळे, प्रशांत रेडीज, यादव शेळके, अरुण मराठे, पुंडलिक रहाटे यांचा समावेश होता. आंदोलनामध्ये सुधाकर वाहुरवाघ, उदय देशमुख, बबनराव पेठकर, नाना पाटील, सुरेश शिरसाठ, रवींद्र तम्मेवार, राजू भोरे यासह असंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते. विभागातील अघोषित शाळांना विहित नमुन्यात आपल्या शाळेचे नाव, शाळेचा यु डायस क्रमांक, इयत्तानिहाय विद्यार्थी संख्या, आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची इयत्तानिहाय संख्या, शाळेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, लिपिक, शिपाई यांची पदनिहाय संख्या ही सर्व माहिती शक्य तितक्या लवकर शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करावयाची आहे. ही माहिती सादर करून शिक्षण आयुक्तांना पाठविले जाणार आहे. विना अनुदानित शाळांच्या न्याय हक्कासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अघोषित शाळांना शासनाच्या प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. कोणत्याही अघोषित शाळा या अनुदानापासून वंचित राहू नये याची खबरदारी शाळांनी घ्यावी, असे आवाहन भोयर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)