शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बैलचलित अवजारासाठी अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:21 IST

जिल्हा परिषद सेस फंडातून कृषी विभागामार्फत आतापर्यत शेतकºयांना शेतीकासाठी ट्रॅक्टरचलित साहित्यासाठी अनुदान दिले जात होते. आता मात्र याऐवजी बैलचलित शेती औजारांसाठी अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या कृषी समिती घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कृषी समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद सेस फंडातून कृषी विभागामार्फत आतापर्यत शेतकऱ्यांना शेतीकासाठी ट्रॅक्टरचलित साहित्यासाठी अनुदान दिले जात होते. आता मात्र याऐवजी बैलचलित शेती औजारांसाठी अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या कृषी समिती घेतला आहे.जिल्हा परिषद सेस फंडातून दरवर्षी शेतकºयांना शेतीकामासाठी साहीत्य खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते. परंतु, हे अनुदान आतापर्यत टॅक्टरचलित साहित्याला दिले जात असे. परंतु, सर्वच शेतकऱ्याकडे टॅक्टर नसल्याने याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत नव्हता. ही बाब लक्षात घेता, जिल्हा परिषद कृषी समितीने शेतीसाहित्याचे अनुदान यापुढे ट्रॅक्टरचलित शेती औजाराऐवजी बैलचलित औजारांना देण्याचा ठराव कृषी समितीने पारीत केला आहे. जिल्हा परिषद कृषी विषय समितीची सभा २० जुलै रोजी उपाध्यक्ष तथा सभापती दत्ता ढोमणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा पुरवठा झाल्याचा मुद्दा सदस्य प्रकाश साबळे,प्रवीण तायडे,प्रताप अभ्यंकर आदी उपस्थित केला.सदस्यांच्या आक्षेपानुसार कृषी विभागाकडे १५५ बोगस बियाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.त्यात महाबीजच्या बियाण्याच्याच ८७ तक्रारी असल्याचे साबळे यांनी कृषी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्यांवर काय कारवाई केली याचा जाब त्यांनी विचारला.दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्यावतीने बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपनी विरोधात ग्राहक मंचात शासनाने दाद मागावी व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी कृषी समितीच्या सदस्यांनी केली. सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सदस्य प्रताप अभ्यंकर, प्रवीण तायडे, गजानन राठोड, जयश्री कोहचाडे, गजानन देवतळे, कृषी विकास अधिकारी तडवी व अन्य अधिकारी उपस्थित होते.