शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक : 'कहीं खुशी, कहीं गम'

By admin | Updated: April 24, 2015 00:12 IST

जिल्ह्यातील ५३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली.

अमरावती : जिल्ह्यातील ५३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली. अर्ध्या तासात ग्रामपंचायतींचे निकाल बाहेर येऊ लागले, तसातसा तरुणाईचा जल्लोष वाढला. दुपारी ३ वाजेपर्यंत ही मतमोजणी सुरू होती. या निवडणुकीत काही ठिकाणी प्रस्थापितांना धूळ चारीत विरोधकांनी बाजी मारली, तर कुठे प्रस्थापित पॅनेलचा दबदबा कायम राहिला. समान मते मिळालेल्या जागांसाठी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या ही ग्रामपंचायत निवडणुकीत तिवसा तालुक्यात आ. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात अनेक ठिकाणी काँग्रेसला बहुमत प्राप्त झाले. स्थानिक पॅनेललाही अनेक ठिकाणी कौल मिळाला. सुरवाडी, कुऱ्हा, तळेगाव ठाकूर, शेंदूरजना बाजारसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्तापालट झाली आहे.राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या दर्यापूर तालुक्यात येवदा येथे विद्यमान सरपंच बाळासाहेब राऊत, प्रदीप देशमुख यांचे पॅनेल विजयी झाले. या तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित पॅनेलला मात देण्यात आली. माजी जि.प. सदस्य बळवंत वानखडे यांच्या पॅनेलने लेहेगावमध्ये बाजी मारली. पथ्रोटग्रामपंचायतीमध्ये १५ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला गड प्रथमच हिरावला गेला आहे.स्थानिक आघाडी, पॅनेलची बाजीगावपातळीवरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी लक्ष ठेवून होते. अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्याच इशाऱ्यावर तडजोड झाली. स्थानिक गटांमध्ये तडजोड होऊन तयार झालेल्या आघाडी, युती, पॅनेलने बाजी मारली. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.२७० ग्रामपंचायतींमध्ये 'महिलाराज' जिल्ह्यात ५३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूक पार पडल्या. यापैकी २७० ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या अंतिम क्षणात महिला आरक्षण घोषित झाल्याने अनेकांचा हीरमोड झाला तर अनेक ग्रामपंचायतींमध्ये सक्षम महिला उमेदवार मिळू शकले नाही. सरपंचपदाच्या निवडीकरिता तारीख जाहीर झाली असल्याने तोपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)