शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध

By admin | Updated: June 12, 2017 00:22 IST

जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या ग्रामपंचायतींना आता निवडणुकीचे वेध लागले आहे.

१ जुलैपर्यंत नाव नोंदणी : ग्रा.पं. संपणार मुदतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या ग्रामपंचायतींना आता निवडणुकीचे वेध लागले आहे. निवडणूक विभागाने या निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्याचे काम हाती घेतले असून १ जुलै २०१७ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना आपली नावे मतदार यादीत नोंदविता येणार आहेत.निवडणूक विभागाने मतदार यादी तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली असल्याने राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्वांनीच ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राहावे यासाठी मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरूवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम संपल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांची लगबग सुरू होईल. जिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर निवडणूक विभागाने मतदार याद्यांचा नूतनीकरण सुरू केले आहे. यासाठी १ जुलै २०१८ ही अंतिम तारीख निश्चित करीत या तारखेपूर्वी ते आपले नावे मतदार यादीत नोंद करतील अशांनाच आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदान करता येणार आहे अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या असून जिल्हा निवडणूक विभागाकडून तशी प्रक्रिया सुरू झाली आहे.सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीजिल्ह्यात एकूण ८३९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी काही ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपत आहेत. सर्वच राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार, विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्वांनीच ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राहावे, यासाठी मोर्चेबांधणीला आतापासून सुरूवात केली आहे.