शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य

By admin | Updated: August 3, 2015 00:14 IST

यंदाच्या हंगामात उशिरा पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना लाभ : प्रतिमाह प्रतिव्यक्ती पाच किलो धान्यलोकमत विशेष

गजानन मोहोड अमरावतीयंदाच्या हंगामात उशिरा पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटना या वर्षात घडू नयेत, यासाठी एक लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रतिव्यक्ती, प्रतिमाह पाच किलो धान्य सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील २ लाख २ हजार ६७ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.औरंगाबाद व अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना आता २ रुपये किलो गहू व ३ रुपये किलो तांदूळ याप्रमाणे प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य लवकरच मिळणार आहे. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेणारे जे लाभार्थी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत इष्टांक मर्यादेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत अशा केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ज्या दराने व परिमाणात अन्नधान्याचा लाभ दिला जातो. त्याच परिमाणात व त्याच दराने अन्नधान्याचा लाभ केशरी कार्डधारकांना आता देण्यात येणार आहे. जिल्ह्यात २ लाख २३ हजार ७०५ केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. यापैकी २ लाख २ हजार ६० शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत. त्यांना २ रुपये किलोप्रमाणे गहू व ३ रुपये किलो प्रमाणे तांदूळ मिळेल.प्राधान्य गटातील केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांना तीन रुपये किलो तांदूळ व दोन रुपये किलो गहू प्रतिमाह व प्रतिव्यक्ती पाच किलोप्रमाणे धान्य देण्यात येणार आहे.- रमेश मावस्कर, विभागीय उपायुक्त (पुरवठा)पांढरे रेशन कार्डधारक शेतकरी वंचितजिल्ह्यात शुभ्र शिधापत्रिकांची संख्या १४ हजार ८३६ आहे. यामध्ये १ हजार ४३२ हे शेतकरी आहेत. शासनाने या शेतकऱ्यांना सवलतीच्या रेशन धान्यापासून वंचित ठेवले आहे. दुष्काळ, नापिकी सर्व शेतकऱ्यांना सारखीच असताना शासन दुजाभाव करीत असल्याचा सदर शेतकऱ्यांचा आरोप आहे.