शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

‘गोवारी’ला पहिल्यांदा मिळाले जात पडताळणी प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:20 IST

गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर या जमातीला पहिल्यांदा जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले आहे. अमरावती विभागातील एका विद्यार्थिनीने मंगळवारी हे प्रमाणपत्र मिळविले.

ठळक मुद्देसमन्वय समितीचा पुढाकार : लढा यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर या जमातीला पहिल्यांदा जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले आहे. अमरावती विभागातील एका विद्यार्थिनीने मंगळवारी हे प्रमाणपत्र मिळविले. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आदिवासी गोवारी समन्वय समितीच्या पुढाकाराने चालविलेला लढा यशस्वी ठरला.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ ऑगस्ट २०१८ रोजी निकाल देऊन गोवारी आदिवासी जमात असल्याचे स्पष्ट केले. केंद्र व राज्य शासनाच्या सूचीमध्ये ‘गोंडगोवारी’ असा उल्लेख असल्याने या जमातीला आदिवासींचे प्रमाणपत्र देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते. राज्यात या जमातीला आदिवासींचे जात प्रमाणपत्र मिळत असले तरी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नव्हते. आदिवासी गोवारी समन्वय समितीचे समन्वयक शालीक नेवारे व अ‍ॅड. मंगेश नेवारे यांनी विधान परिषदेचे आमदार अरुण अडसड यांच्यासमोर आदिवासी गोवारींना जात पडताळणी प्रमाणपत्राविषयी येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यानुसार, आ. अडसड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, राज्यमंत्री परिणय फुके यांनीही आदिवासी आयुक्तांसमोर सकारात्मक बाजू मांडली. परिणामी अमरावती विभागात पहिले जात पडताळणी प्रमाणपत्र रुचिता बबनराव लसवंते या विद्यार्थिनीने मिळविले आहे. तिला मंगळवारी हे प्रमाणपत्र प्राप्त झाले.राज्यातील सर्व आदिवासी गोवारी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणार असल्याने आदिवासी गोवारी समन्वय समितीचे समन्वयक शालीक नेवारे, मारोतराव वाघाडे, भाऊराव चौधरी, पुंडलिक चामलोट यांनी आभार मानले आहेत.

टॅग्स :Governmentसरकार