शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भंगार वाहनांमुळे शासनाचा लाखोंचा महसूल पाण्यात; प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

By जितेंद्र दखने | Updated: August 24, 2023 20:45 IST

निर्लेखित वाहनांची लागेना विल्हेवाट

अमरावती : शासकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याच्या दिमतीला सरकारकडून वाहने पुरविली जातात. मात्र, ही वाहने नियमानुसार कालबाह्य झाल्यानंतर त्याची वेळीच विल्हेवाट लावली जात नसल्याने भंगार अवस्थेत पडून आहेत. परिणामी या वाहनांचा लिलाव करून विल्हेवाट विहीत मुदतीत लावली जात नाही.परिणामी शासनाच्या महसुलावर पाणी फेरले जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, गृहनिर्माण विभागाच्या परिसरात अशा भंगार गाड्यांचा कचरा जागोजागी पडला असून, हीच परिस्थिती आरोग्य विभागासह अन्य विभागांतही दिसून येत आहे. शासनाच्या धोरणानुसार कुठल्याही वाहनाचे आयुर्मान १५ वर्षे ठरले आहे. याशिवाय ज्या शासकीय विभागातील वाहन किमान अडीच लाख किलोमीटर किंवा दहा वर्षाहून अधिक वापर होऊन नादुरुस्त झालीत, अशी वाहने नियमानुसार निर्लेखित केली जातात. सदर वाहनांचे नियमानुसार मूृल्यांकन करून त्याची लिलावाद्वारे किती किंमत अपेक्षित आहे, याचेही नियोजन केले जाते. प्रत्यक्षात शासकीय विभागाकडे वापरात नसलेली अशी बरीच वाहने शासकीय कार्यालयाच्या परिसरात जागा व्यापून आहेत. मात्र अनेक भंगार वाहनांची संबंधित विभागाकडून वेळीच विल्हेवाट न लावल्यामुळे ती जागीच गंजत आहेत. परिणामी यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शासनाच्या या वाहनांचा लिलाव केला जात नसल्याने याबदल्यात मिळणारा लाखो रुपयांचा महसूृल बुडत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जुन्या गाड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. 

मनपा,एसटी महामंडळाला मिळाला मोबदलास्थानिक  महापालिका प्रशासनाने भंगार वाहने व निरुपयोगी साहित्याचा लिलाव करून सुमारे ६२ लाख ८० हजार ९९७ रुपये शासन तिजोरीत जमा केले. याशिवाय एसटी महामंडळाकडूनही एसटी बसचे १५ वर्षांनंतर आयुर्मान संपताच अशा गाड्या स्क्रॅप केल्या आहेत. या बदल्यात महामंडळाच्या तिजोरीत भर पडली आहे. असे असतांना जिल्ह्यातील अनेक शासकीय विभागात भंगार वाहने पडून आहेत. त्याची निर्लेखनानंतर विल्हेवाट का लावली जात नसल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.