शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सुरू होणार शासकीय मूग खरेदी केंद्र

By admin | Updated: September 2, 2016 00:17 IST

नव्या मुगाची बाजारात आवक होताच दरात मोठी घसरण झाली आहे. या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने मुगाची हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे.

पणन मंत्र्यांच्या सूचना : हमीभावाने होणार खरेदीअमरावती : नव्या मुगाची बाजारात आवक होताच दरात मोठी घसरण झाली आहे. या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने मुगाची हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. १ सप्टेंबरपासून खरेदीस प्रारंभ करण्याच्या सूचना राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच जिल्ह्यात शासकीय मूग खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. दरम्यान केंद्र शासनाने मूग उत्पादक राज्यांना शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्याचेही निर्देश दिले आहेत. सद्या बाजारात मुगाची आवक सुरू झालेली असून शेतकऱ्यांना आधारभूत दरापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने प्रचलित पद्धतीनुसार खरेदी सुरू करण्यासाठी नाफेडला पणन महासंघाकडून विनंती करण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरात मूग विकू नये असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. मागील दोन वर्षांपासून कडधान्य आणि डाळींच्या दरात वाढ झाल्याने शासनाने शेतकऱ्यांनी कडधान्याचा पेरा वाढविण्याचे आवाहन केले होते. याकरिता हमी भावातही वाढ करण्यात आली परिणामी जिल्ह्यात कडधान्याचा पेरा बऱ्यापैकी वाढला आहे. अशातच नव्या मुगाची आवक बाजारपेठेत सुरू होताच भावात ३५०० रुपयांपर्यंत घसरण झाली. मुगाचा हमीभाव ५२२५ रुपये प्रति क्विंटल आहे. बाजारात मात्र या हमी भावापेक्षाही कमी भावाने शेतकऱ्यांन मिळत असल्याने हा प्रश्न धामणगाव रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांची २९ आॅगस्ट रोजी मुंबईत भेट घेवून निदर्शनास आणून दिली होती. पोळा सण तोांवर आल्यानंतरही शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने व्यापाऱ्यांकडून मूग खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र हमीभावाने मूग खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासोबतच जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनाही याबाबत निवेदन दिले होते. ही बाब लक्षात घेता शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.याबाबत संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)