शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत लवकरच साकारणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी २०१७ पासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचालनालयाने (डीएमईआर) २०१९ मध्ये समिती स्थापन केली. जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदगावपेठ येथील १८.५३ हेक्टर जागेवर उभारण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सुस्पष्ट सूचना केल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून, महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यासाठी जागेची निश्चिती झाली असून, चार सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या सूचनांनुसार सुसज्ज महाविद्यालय आकारास येणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर यामुळे पडणार आहे, असा विश्वास पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी २०१७ पासून केली जात आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन व संचालनालयाने (डीएमईआर) २०१९ मध्ये समिती स्थापन केली. जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये हा विषय कॅबिनेटपुढे येऊन सकारात्मक चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही महाविद्यालयासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. आता जागेचाही प्रश्न सुटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.

तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नियुक्तअमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी समन्वय अधिकारी व तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पराते यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. तारकेश्वर गोडघाटे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. व्ही.आय. खंडाईत यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नोडल अधिकारी म्हणून डॉ.विजय शेगोकार यांच्याकडे, तर प्रशासकीय कामकाजात मदत करण्यासाठी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा’च्या (एनएमसी) निकषानुसार प्रस्तावित जागा, नियोजित रचना आदींबाबत अहवाल सादर करण्याचाही सूचना समितीला आहेत.

अमरावतीकरांसाठी बहुप्रतीक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला. त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे भरीव योगदान मिळाले. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात जागेचा प्रश्न सुटला. लवकरच मेडिकलच्या निर्मितीला प्रारंभ होईल. - यशोमती ठाकूर पालकमंत्री

नांदगाव पेठेत जागा निश्चित

नांदगाव पेठमधील १८.५३ हेक्टर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरMedicalवैद्यकीय