शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर समाजाचा दबाव आवश्यक : सरसंघचालक मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 10:13 IST

अमरावती शहरानजीकच्या भानखेडा मार्गालगत साकारण्यात आलेल्या संत कंवरधाम येथे संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडीया यांच्या ऐतिहासीक गद्दीनशीनी समारोह ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. 

ठळक मुद्देसरकारवर समाजाचा दबाव असावा : मोहन भागवतअमरावती येथे सिंधी समाजाचा गद्दीनशीनी समारोह थाटात

अमरावती : सरकारच्या नावातच ‘स’ म्हणजेच सकारात्मकता आणि  ‘रकार’ म्हणजे सरकार सत्ता असेपर्यंत सरकार राज्य करेल, मात्र समाज एकत्र असेल आणि समाजाचा दबाव असेल तर सरकारला त्या गोष्टी करणे बंधनकारक असतात. मग ते सरकार कोणतेही असो. सरकारला समाजाच्या सोबत राहावे लागते आणि समाज ठरवेल तोपर्यंत सरकार राहू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी अमरावती येथे केले.

अमरावती शहरानजीकच्या भानखेडा मार्गालगत साकारण्यात आलेल्या संत कंवरधाम येथे संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडीया यांच्या ऐतिहासीक गद्दीनशीनी समारोह ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. आज सर्व काही झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे आता संपूर्ण समाजाने सुद्धा एकत्र येऊन चांगला विचार करणे गरजेचे आहे. समाजाने वाईट विचार केला तर त्यातून गुंडागर्दी निर्माण होऊ शकते, वाईट गोष्टी घडतात म्हणून सर्वांचे मन चांगले बनावे, अशी मनिषा त्यांनी व्यक्त केली.

मी तर सरकारमध्ये जात नाही, एकच गोष्ट सरकारने मला दिली, ती म्हणजे सुरक्षा. बस एवढेच माझ्याजवळ सरकारचे आहे, मी समाजाचा आहे, त्यामुळे मी सरकारमध्ये जात नाही, पण आपण सरकारमध्ये असलो तर चांगलं काम करू शकतो, मला इच्छा नसताना सुरक्षा मिळाली, प्राजंळ  मत भागवत यांनी मांडले.

यावेळी मंचावर चार प्रमुख धामचे प्रमुख ब्रदिकाश्रमाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज (प्रयागराज), अंजनगाव सुर्जी येथील देवानथ मठाचे मठाधीश पूज्य जितेंद्रनाथ महाराज, साई राजेशलाल मोरडीया, लखनौ येथील संत बाबा चांडूराम, शदाणी दरबार रायपूर येथील पीठाधिश्वर साई युधिष्ठिरलाल, कांचन राय, नानक आहुजा, ईश्वरीदेवी, लप्पीसेठ जाजोदिया आदी उपस्थित होते.देशात सिंधी युर्निव्हसिटी व्हावी

सिंधी समाजाची मातृभूमि भारत आहे. त्यामुळे सरकारने देशात सिंधी युर्निव्हसिटी करावी. यापुढे संताच्या सुरक्षेचे काम करावे लागेल. आपले हक्क, अधिकार,  मागण्यासाठी सरकारला बाध्य करावे, असे भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतAmravatiअमरावती