शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यातून गोवंशाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:31 IST

येथून अकोला येथील कत्तलखान्याकडे जाणाऱ्या एका वाहनातील नऊ गोवंशांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली, तर चौघे पसार होण्यात यशस्वी झाले. बुधवारी रात्री आठ वाजता शहरातील अंजनगाव बस स्टॉपवर ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देदोघांना अटक : चौघे पसार, अंजनगाव स्टॉपवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : येथून अकोला येथील कत्तलखान्याकडे जाणाऱ्या एका वाहनातील नऊ गोवंशांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली, तर चौघे पसार होण्यात यशस्वी झाले. बुधवारी रात्री आठ वाजता शहरातील अंजनगाव बस स्टॉपवर ही कारवाई करण्यात आली. त्यांचेकडून ६ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जिल्हा गुन्हे शाखेच्या अचलपूर पथकाने शहरातील अंजनगाव स्टॉप येथे एमएच ३० बीडी ०९३५ क्रमांकाचे मालवाहू वाहन तपासले असता, त्यात नऊ गोवंश जनावरे आढळून आली. त्यांची किंमत १ लाख ८ हजार रुपये सांगण्यात आली. शेख इमरान शेख रज्जाक (३५, मुजफ्फरनगर, लकडगंज, अकोला) व अजमत शहा (१८, दिरानगर, अकोटफैल, अकोला) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध परतवाडा पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहजादखान पीरखान मोती मिल रोड अकोला, शरीफ कुरेशी (मोमीनपुरा अकोला), शेख सलीम शेख अब्दुल आणि मतीन (रा.कुरेशी मोहल्ला, करजगाव) असे चौघे पसार झाले. करजगाव येथील दोन्ही आरोपींविरुद्ध शिरजगाव, चांदूर बाजार, परतवाडा येथे गोवंश तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. सर्व गोवंश रासेगाव येथील गौरक्षणात पाठविण्यात आले.गोवंश तस्करी आणि पेट्रोलिंगअकोला येथे कत्तलखान्यात नेण्यात येणारे गोवंश एका मालवाहू वाहनातून नेत असताना ते वाहन सुरक्षित निघत आहे किंवा नाही, वाहतुकीदरम्यान धोका आहे किंवा कसे, हे पाहण्यासाठी अन्य एका वाहनात चार जण आढळल्याचे पोलीस तपासात उघड झाले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पोलीस कॉन्स्टेबल त्र्यंबक मनोहर, गजेंद्र ठाकरे, योगेश सांभारे, प्रवीण अंबाडकर, गणेश मांडोवकर यांनी केली.