शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मालमत्ता मूल्यांकनासाठी जीआयएसऐवजी गुगल मॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 22:24 IST

मालमत्ता सर्वेक्षणासाठी जीआयएस प्रणालीवर आधारित नकाशे उपलब्ध होत नसतील त्याच स्थितीत गुगल मॅप व अन्य समकक्ष नकाशांचा आधारे सर्वेक्षण करण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे.

ठळक मुद्दे शासन निर्णयात सुधारणा : महापालिका यंत्रणेला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मालमत्ता सर्वेक्षणासाठी जीआयएस प्रणालीवर आधारित नकाशे उपलब्ध होत नसतील त्याच स्थितीत गुगल मॅप व अन्य समकक्ष नकाशांचा आधारे सर्वेक्षण करण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे. नगरविकास विभागाने १६ सप्टेंबरला काढलेल्या या सुधारित शासन निर्णयाने अमरावती महापालिकेला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.अमरावती महापालिकेत जीआयएसऐवजी ड्रोनद्वारे मिळालेल्या नकाशांच्या आधारे सर्वेक्षण केले जाणार होते. निविदा प्रक्रियेतही ड्रोनचाच समावेश होतो. त्यामुळे जीआयएस प्रणालीवर आधारित नकाशांसाठी महापालिकेला तशी अट करारनाम्यात समाविष्ट करण्यासह नव्याने निविदा करण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र नगरविकास विभागाने १२ जूनच्या शासन निर्णयातील जीआयएसची अट शिथिल केल्याने महापालिकेचे घोडे गंगेत न्हाले आहेत. राज्यातील सर्व क व ड वर्ग महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीला मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता आकारणी करण्याच्या योजनेला राज्य सरकारने १२ जूनला मान्यता दिली. त्यानुसार महाराष्टÑ रिमोट सेव्हिंग अप्लिकेशन सेंटर (अमआरएससी) नागपूर यांचेकडून सर्व नागरी स्थानिक क्षेत्राचे जीआयएस प्रणालीवर आधारित नकाशे प्राप्त करून सर्वेक्षण व पुढील प्रक्रिया करण्याचे निर्देश होते. तथापि एमआरसीएसीकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे जीआयएस आधारित नकाशे उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होतील, अशी शक्यता वर्तविली गेली. नकाशे उपलब्ध होण्यास विलंब झाल्यास सर्वेक्षणाच्या कामातही विलंब होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेतली गेली. त्यापार्श्वभूमीवर ज्या नागरी स्थानक क्षेत्रांचे नकाशे एमआयएससीकडून उपलब्ध झाले नसतील तेथे इतर नकाशांच्या आधारे सर्वेक्षणाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जीआयएस आधारित नकाशे उपलबञध झालेले नसतील तेथे गुगल मॅप व अन्य समकक्ष नकाशांच्या आधारे सर्वेक्षणाची सुधारणा १६ सप्टेंबरच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. शासनाने जीआयएसमध्ये रिलॅक्शनसेशन दिल्याने अमरावती महापालिका संबंधित कंत्राटदाराकडून ड्रोनद्वारे सर्वेक्षण करू शकणार आहे.असे आहेत सुधारित निर्देशनागरी स्थानिक क्षेत्रांचे जीआयएस प्रणालीवर आधारित नकाशे एमआयएसएसीद्वारे प्राप्त होतील. तेथे या नकाशांद्वारे सर्वेक्षण व पुढील कारवाई करणे आवश्यक असेल. तथापि ज्या नागरी स्थानिक क्षेत्रांचे जीआयएस प्रणालीवर आधारित नकाशे एमआरएसएसीद्वारे उपलब्ध झाले नसतील व सर्वेक्षणाची कारवाई सुरू करणे आवश्यक असेल तेथे गुगल मॅप व अन्य समकक्ष नकाशांच्या आधारे सर्वेक्षणाची कारवाई करण्यात यावी.