शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला ‘अच्छे दिन’, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:13 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारतींचे नूतनीकरण व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये वितरित केल्यानंतर शासनाने वैद्यकीय अधिका-यांचा अनुशेष निर्मूलनाकडे लक्ष वळविले आहे.

अमरावती : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारतींचे नूतनीकरण व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये वितरित केल्यानंतर शासनाने वैद्यकीय अधिका-यांचा अनुशेष निर्मूलनाकडे लक्ष वळविले आहे. अनेक डॉक्टर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत न येता खासगी प्रॅक्टीसला प्राधान्य देतात. त्याचे कारण वैद्यकीय अधिका-यांच्या वेतनसंरचनेत दडले आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिका-यांचे वेतन व पदभरतीकडे शासनाने कटाक्ष टाकला आहे.महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिका-यांच्या वेतन, पदभरती याबाबत उपाययोजना व शिफारशी करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या दहा सदस्यीय समितीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. दिलीप वळसे पाटील, आ. अनिल बोंडे, आ. अनिल परब, आ. राहुल पाटील, आ. भाई जगताप हे सदस्य असतील. आरोग्य सेवा संचालक हे सदस्य सचिव असणार आहेत.आ. विक्रम काळे यांनी वैद्यकीय अधिका-यांचे वेतन वाढवावे, अशी सूचना विधिमंडळात केली होती. त्यानुसार विधिमंडळाच्या दोन्ही सदनातील सदस्यांचा समावेश असलेली ही समिती तीन महिन्यांत त्यांचे अभिप्राय व शिफारशी सादर करणार आहेत.

समितीची कार्यकक्षा- सार्वजनिक आरोग्य विभागास पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे वेळेवर उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना सुचविणे.- वैद्यकीय अधिकारी यांच्या वेतनात वाढ करण्याची बाब तपासणे व उपाययोजना सुचविणे.- दीर्घकाळ (तीन महिन्याहून) विनापरवाना गैरहजर राहणाºया वैद्यकीय अधिका-याविरूद्ध कोणत्या प्रकारची कारवाई करावी, याची शिफारस करणे.

टॅग्स :Healthआरोग्य