शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

गोल्डन गँगचे कमबॅक, टक्केवारीची बजबजपुरी

By admin | Updated: August 13, 2016 00:03 IST

१३ महिन्यांच्या कालावधीनंतर गोल्डन गँगने जोरदार कमबॅक केले आहे.

महापालिकेतील वास्तव : निवडकांचा दबदबा, आयुक्तांना सल्लेअमरावती : १३ महिन्यांच्या कालावधीनंतर गोल्डन गँगने जोरदार कमबॅक केले आहे. यंत्रणेच्या निर्णय प्रक्रियेत गोल्डन गँगच्या सदस्यांनी आपली मोहोर उमटविण्यासाठी धडपड चालविली आहे. या पुनर्प्रवेशामुळे टक्केवारीच्या बजबजपुरीत घसघशीत वाढ झाली आहे.तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कार्यकाळात गोल्डन गँग अशी नवी बिरुदावली काहींच्या नावामागे लागली. या गोल्डन गँगमध्ये त्यावेळी ७ ते ८ जणांचा समावेश होता. या गोल्डन गँगने सांगायचे आणि यंत्रणेने त्यावर डोळे झाकून शिक्कामोर्तब करायचे, असा त्यावेळचा शिरस्ता होता. ही गोल्डन गँग महापालिका चालवीत असल्याचा आरोप त्यावेळी सातत्याने झाला. या कालावधीत शहराचा विकास खुंटला. मात्र विशिष्ट लोकांचे आर्थिक हितसंबंध जोपासले गेले. माजी मंत्री सुनील देशमुख यांनीच या मोजक्यांना गोल्डन गँग असे नामानिधान दिले होते. सुरक्षा रक्षकांचा कंत्राट असो वा साफसफाईचा. अत्र-तत्र, सर्वत्र या गोल्डन गँगचा दबदबा होता. तत्कालीन यंत्रणेचेही त्याला पाठबळ असल्याने या गोल्डन गँगचे फावत राहिले. या महापालिकेचेच नव्हे, तर अंबानगरीचे आम्हीच जाणकार आहोत, अशी आवई त्यावेळी उठविण्यात आली. त्यांची ही कृती यंत्रणेतील भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी ठरली.डोंगरे यांच्या कार्यकाळात गोल्डन गँगने महापालिकेवर अक्षरश: वर्चस्व गाजवले. गोल्डन गँगचा वारू चौखूर उधळत असताना १४ एप्रिलला चंद्रकांत गुडेवार यांनी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. आल्या आल्या गुडेवारांवरही जाळे फेकण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते त्यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे इतरांप्रमाणे गोल्डन गँगही बॅकफूटवर आली. गुडेवारांच्या बदली आदेशाने हा स्लॅक सिझन संपुष्टात आला. आयुक्तपदी हेमंत पवार रुजू झाले आणि लागलीच गुडेवारांच्या बदलीचा विरोध करणारे, रस्त्यावर उतरणारे पवारांच्या तंबूत डेरेदाखल झाले. पुन्हा सल्ल्यांचा रतीब घालण्यास सुरुवात झाली. आपल्याला प्रत्येक समस्यांची जाण, त्या समस्यांचे सोल्युशन आहे, असे किस्से ऐकविण्यास सुरुवात झाली आहे.स्वत:च्या राजकारणाला पोषक ठरेल आणि आपलेच महत्त्व वाढेल, अशी व्यूहरचना भक्कमपणे रचण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य अधिकारीपदावर प्रभारी व्यक्ती कसे सक्षम आहेत हे पटवून सांगण्याचा प्रयत्न असो वा एखाद्या निलंबित कर्मचाऱ्याची पुन:स्थापना असो प्रत्येक बाबींमध्ये नाक खुपसण्याचे जोरकस प्रयत्न नव्याने सुरू झाले आहेत.गोल्डन गँगचा विरोधही वाढलागोल्डन गँगचा वाढता प्रभाव महापालिका वर्तुळासाठी कमालीचा त्रासदायक ठरू लागला आहे. मागे एका बैठकीत तर विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याला डावलले जात असल्याची बाब स्पष्टपणे आयुक्तांसमोर बोलून दाखविली होती. आम्हालाही कळते, आपल्यालाही समस्यांची, त्यावरील उपायांची जाण असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितल्यावर आयुक्तांनी सर्वांनाच बैठकीला बोलावण्याच्या सूचना अधिनिस्थांना दिल्या होत्या. मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याने संतापात भर पडली आहे. यंत्रणेकडून आपल्याला डावलले जात असल्याची भावना तीव्र होत चालली आहे.