शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोने चमकवून देण्याची बतावणी करणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:55 IST

सोने चमकवून देण्याची बतावणी करीत महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. कुमोद साह वसुदेव साह ठठेरा (४२) व फुलचंद साह सुरेश साह (६०, दोन्ही रा. लक्ष्मीपूर बरारी, गुरुबाजार कटिहार, रा. बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने चमकवून देण्याचे सर्व साहित्य जप्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोने चमकवून देण्याची बतावणी करीत महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. कुमोद साह वसुदेव साह ठठेरा (४२) व फुलचंद साह सुरेश साह (६०, दोन्ही रा. लक्ष्मीपूर बरारी, गुरुबाजार कटिहार, रा. बिहार) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने चमकवून देण्याचे सर्व साहित्य जप्त केले आहे.मागील काही महिन्यांत शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी सोने चमकावून देण्याची बतावणी करून दागिने लंपास केल्याच्या काही घटना समोर आल्या आहे. शहरातील कोतवाली, गाडगेनगर, राजापेठसुद्धा या घटना घडल्या होत्या. सद्यस्थितीत गणेशोत्सव व महालक्ष्मी पूजनांचे पर्व सुरू असताना अनेक महिला दाग-दागिने चमकवून घेत असतात. सोने चमकावून देणारे भामटे अशाच संधीचा गैरफायदा घेऊन महिलांची फसवणूक करतात. या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, उपायुक्त प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राम गिते, शिपाई प्रकाश जगताप, जावेद अहमद, मो. सुलतान, इंद्रजित राठोड, निलेश पाटील व चालक संतोष रौराळे यांची शहरात पेट्रोलिंग सुरु होती.दरम्यान, पोलिसांना खोलापुरी गेट हद्दीतील महाजनपुºयात एका घरासमोर दोन जण दागिने चमकावित असल्याचे आढळले. पोलिसांना चौकशीदरम्यान त्यांच्याकडे बरेच संशयास्पद साहित्य आढळले.