शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गुटखाबंदीला मुख्यालयाचा ‘खो’

By admin | Updated: November 30, 2015 00:29 IST

शहराच्या विविध भागांत गुटख्याची बिनबोभाट विक्री होत असल्याचा आरोप होत असताना गुटखाबंदीला अमरावती मुख्यालयानेच ‘खो’ दिल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे.

अमरावती : शहराच्या विविध भागांत गुटख्याची बिनबोभाट विक्री होत असल्याचा आरोप होत असताना गुटखाबंदीला अमरावती मुख्यालयानेच ‘खो’ दिल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. गुटखाबंदी निर्णयाची पुरेपूर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाची आहे. या विभागच्या जवादे कम्पाऊंडमधील कार्यालयातून पाच जिल्ह्याचा कारभार चालतो. सर्व उच्चपदस्थ अधिकारी अमरावती मुख्यालयी बसतात. विभागातील इतर चार जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्हामध्ये कारवाई दरम्यान जप्त केलेल्या गुटख्याची किंमत सर्वात कमी आहे. त्यामुळे अमरावती मुख्यालयात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुटखाबंदीचा कायद्याची अंमलबजावणी कागदावर ठेवल्याचे दिसूद येत आहे. शहरात तर प्रत्येक पानटपरीवर नाव घेतल्याबरोबर हवी असलेली गुटखापुडी उपलब्ध आहे. केवळ सरसरतच नव्हे तर जिल्ह्यात सर्वदूर हीच परिस्थती आहे. फरक पडला आहे तो फक्त किंमतीचा गुटखाबंदी असल्याने हा गुटखा फक्त बाजारात चढ्या दराने विकल्या जातो. जर पानटपरीनिहाय गुटखापुडींची विक्री होत असेल तर प्रत्येक पानटपरीवर तो माल पोहचविला जात असेल. अर्थात शहरातच गुटखाचा मोठा साठा असल्याचे वास्तव आहे. तथापि गेल्या वर्षभरात अन्न व औषधी प्रशासन गुटखा तस्करांवर ‘जरब’ बसविण्यात अपयस्वी ठरले आहे. अमरावती येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाशी अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि यवतमाळ हे पांच जिल्हे जोडले आहेत. त्यातल्या, त्यात अमरावती शहर आणि जिल्ह्याचे कार्यक्षेत्र अधिक असल्याने गुटखाविक्रीचे प्रमाण अधिक आहे. मात्र त्यातुलनेत विभागातील इतर जिल्ह्यातील जप्तीचे प्रमाण अमरावतीपेक्षा कितीतरी परीने अधिक आहे. मध्यंतरी तर गुटखा तस्करांवर अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनाची केला होता. त्याबाबत अन्न व पुरवठा मंत्र्याकडे तक्रार सुद्धा करण्यात आली होती. गुटखाबंदी असताना अगदी सहजतेने कुठला गुटखा सहज प्रकारे उपलब्ध होत असल्याने अन्न व औषधी प्रशासन टिकेच्या सदस्यस्थानी असते. त्यातच इतर जिल्ह्यातील जप्तीचे प्रमाण अमरावतीपेक्षा अधिक असल्याने अमरावती मुख्यालयी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील रामपुरी कॅम्प, मसानगंज, बडनेरा, दहिसाथ या भागातून हजारोंरुपयांचा गुटखासाठा वर्षाच्या पुर्वार्याला जप्त करण्यात आला. तथापि त्यानंतरही शहराच्या कानाकोपऱ्यात सर्रास मिळणारा गुटखा या विभागावर संशयाची सुई दर्शविणारा आहे. (प्रतिनिधी)